Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात; सर्व नव्या मंत्र्यांची हजेरी

मंत्रिमंडळ बैठकीत विभागवार निर्णय होतील त्यानुसार खातेवाटपही होईल असं सांगण्यात येत आहे.
Maharashtra Cabinet
Maharashtra Cabinet

नवी दिल्ली : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला यामध्ये १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्र्यांचा समावेश झाला आहे. दरम्यान, आज या मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. याच बैठकीत विभागावर निर्णयांनुसार खाते वाटपही होईल, असा अंदाज आहे. (Maharashtra Cabinet meeting begins attendance of all new ministers)

मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली असून बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या राज्यात सर्वदूर पावसानं थैमान घातलं आहे. सर्व प्रशासकीय प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांचं तसेच सर्वसामान्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं या नुकसानीचे पंचनामे करुन मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com