
farmer news
esakal
Maharashtra Cabinet Meeting: महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली, तर काहींची घरेही पाण्याच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. “आता दिवाळी कशी साजरी करायची?” असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. काही शेतकऱ्यांनी तर सर्वस्व नष्ट झाल्याने हताश होऊन आत्महत्येचा मार्गही स्वीकारला.