esakal | महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas-Aghadi

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?

sakal_logo
By
रामनाथ दवणे

शिवसेना, राष्ट्रवादीचेही एक-एक मंत्रिपद आहे रिक्त

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. २०१९मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापित झाले. त्यानंतर काही महिन्यांतच कोरोनाने जगला विळखा घातला. कोरोनाकाळात महाराष्ट्रात हाहा:कार माजला होता. त्यातच महाराष्ट्रात सचिन वाझे प्रकरण, १०० कोटी वसुली प्रकरण, संजय राठोड राजीनामा, अनिल देशमुख राजीनामा अशी प्रकरणं खूपच चर्चेत राहिली. आता विधानसभा अध्यक्षासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत हे सरकार आहे. असतानाच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Cabinet Reshuffle Congress two Minsters in Danger Zone NCP Shivsena eager to fill empty spots)

कोण होईल IN, कोण होईल OUT?

मंत्रिमंडळ बदलाबाबत तीनही पक्ष अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची एक-एक मंत्रीपदाची जागा रिक्त आहे. दोन्ही पक्ष मंत्रीपदाच्या जागा भरण्यास अनुकूल आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्रीपद रिक्त आहे तर संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे एक मंत्रीपद रिक्त आहे. ही दोन्ही मंत्रीपदे भरण्यास पक्ष उत्सुक आहेत.

काँग्रेसचे दोन मंत्री 'डेंजर झोन'मध्ये?

काँग्रेसही काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे अशी चर्चा आहे. त्यात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या जागी दोन नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पाडवी यांच्या जागी आदिवासी चेहरा, तर अस्लम शेख यांच्या जागी मुस्लिम चेहरा दिला जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे.

loading image