

Caste Validity Applications
sakal
Mumbai: शिक्षणातील प्रवेश, सरकारी नोकरी किंवा निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर आता अर्जदारांची कार्यालयीन धावपळ कमी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन परिपत्रक जारी केले. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार असून, ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.