
मुंबई - महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाचे नायक देवेंद्र फडणवीस असून त्यांच्याच हाती महाराष्ट्राची सूत्रे सोपविण्याचा निर्णय भाजपमध्ये जवळपास निश्चित झाला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत याबद्दलची चर्चा झाली असून या विजयाच्या भव्यतेला साजेशा समारंभात शपथविधी सोहळा करण्याचे ठरत असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विजय मिळाला हे भाजपला पूर्णत: समजत असून त्यांच्याही या कर्तृत्वाचा मान राखला जाईल, असे या नेत्याने सांगितले.