दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

मागील पाच दिवसांपासून राज्यात पावासाने हाहा:कार माजवला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारासह राज्यात पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालं. पूरग्रस्त स्थिती, दरड कोसळल्यामुळे आणि इतर दुर्घटनामुळे राज्यात 80 पेक्षा जास्त जणांना जीव गमावाला लागला. अनेक जण मलब्याखाली गाढले गेलेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. गाई-जनावारांसह पिकांचेही नुकसान झालेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरीसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटानग्रस्त जिल्ह्यांना मदतीची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळोई येथील दुर्घटनाभागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्यात मागील पाच दिवसांत पावासाने हाहा:कार माजवला असून अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. कोकण-प. महाराष्ट्र पावसामुळे जायबंदी झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं सांगिलं आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले. शुक्रवारी मंत्रालयातील नियंत्रण कक्षात जाऊन घटनेचा आढवा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षात आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या, आहेत.

loading image
go to top