
पाली : राज्यातील सर्व विभागातील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, हॉट मिक्सधारक कंत्राटदार, मजूर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत. यात रायगडातील 3 हजार कोटींची थकबाकी आहे. ही देयके तातडीने देण्यात यावी, अशी मागणी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे रायगड कंत्राटदार संघटनेच्या वतीने नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.