esakal | राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यूंची संख्या काहीशी वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांचा (Corona Active patient) आकडा वाढून 50 हजाराच्या वर गेला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून 49,796 वरून 59,400 इतकी झाली.आज राज्यात 3623 नव्या रुग्णांची (corona new patient) भर पडली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,97,877 झाली आहे. मृत्यूचा आकडा ही कमी होऊन 46 पर्यंत खाली आला. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,38,142 इतका झाला आहे.

हेही वाचा: अनुदानाच्या प्रश्नावर शिक्षक संघटना पुन्हा एकदा मैदानात; आंदोलनाचा इशारा

नागपूर,अकोला,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 8,नाशिक 11,पुणे 16,कोल्हापूर 8,लातूर 3 मृत्यू नोंदवले गेले. आज 2972 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,05,788 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.04 % एवढे झाले आहे.सध्या राज्यात 2,98,207 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,892 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top