
Maharashtra Covid19 Update : दिवसभरात सुमारे 500 नव्या रुग्णांची भर! किती बरे, किती मृत्यू? वाचा डिटेल्स
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. दिवसभरात ४८३ नव्या रुग्णांची भर पडली असून ३१७ रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. (Maharashtra Covid19 Update 483 new patients added in 24 hours need to know details)
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात ४८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ३१७ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानं ते बरे झाले आहेत. तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा ९८.१५ टक्क्यांवर आहे. तर मृत्यूचा दर १.८२ टक्के आहे.
हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत ८ कोटी ६६ लाख ०७ हजार ६७५ जणांची कोरोनाची चाचणी झाली असून यांपैकी ८० लाख ४२ हजार ९९२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा एकूण पॉझिटिव्हीटीचा दर ९.४० टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.