Devendra Fadnavis : आम्हाला उद्धव ठाकरेंचा बदला घ्यायाचा....देवेंद्र फडणवीसांनी दिली कबूली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis : आम्हाला उद्धव ठाकरेंचा बदला घ्यायाचा....देवेंद्र फडणवीसांनी दिली कबूली

Devendra Fadnavis : आम्हाला उद्धव ठाकरेंचा बदला घ्यायाचा....देवेंद्र फडणवीसांनी दिली कबूली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्याचा आम्हाला बदला घ्यायचा होता. अशी कबूली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी दिली. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. (Maharashtra Deputy Cm Devendra Fadnavis Said Uddhav Thackeray Backstabbed Us So We Wanted Revenge )

मुलाखतीदरम्यान वृत्तसंस्थेने फडणवीस यांना सत्ताबदलासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी ही एक आमची रणनिती असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच, आम्ही विरोधी पक्षात होतो. शिवसेना आमच्याशी बेईमान होती. उद्धव यांनी फडणवीस आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्याशी अप्रामाणिकपणा होत असेल तर त्याला उत्तर देऊ, असा इशारा देत याचे श्रेयही उद्धव यांना जाते. अशा खोचक टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

काय म्हणाले फडणवीस?

आम्हाला बदला घ्यायचा होता. गदारोळ झाला तेव्हा शिंदे यांच्याशी बोलून आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत, आमच्यासोबत झालेल्या बेईमानीचा बदला आम्ही घेतला आहे, असे सांगितले. मला अप्रामाणिकपणाचा बदला घेण्याची इच्छा होती. अशी कबूली फडणवीस यांनी दिली.

गदारोळ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा झाली, तेव्हा माझ्यासोबत काही नेते पीसीमध्ये बसले होते, राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तीन-चार जणांनाच होता.

सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत गेल्या. त्यामध्ये कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मी जबाबदारीने हे वक्तव्य करतोय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, हा माझा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, हा माझ्यासाठी धक्का नव्हता. अशा शब्दात राजकीय पडद्यामागे नेमकं काय घडलं हे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.