Talathi Protest Over Crop Inspection
esakal
-कुंडलिक पाटील
कुडित्रे : राज्य शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’अंतर्गत प्रणालीद्वारे सुरू असलेल्या पीक पाहणीच्या कामात प्रशासकीय विसंगती आणि अन्यायकारक जबाबदारी निश्चित केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने पीक पाहणीच्या पडताळणीवर बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. तलाठ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरात पीक पाहणीच्या पडताळणीची प्रक्रिया ठप्प झाली असून, गाव नमुना नंबर १२ वर पीक नोंदी अडकल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली (Maharashtra Talathi protest over crop inspection) आहे.