

Maharashtra Records 95% Rainfall Deficit in October
esakal
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाने मोठी ओढ दिली असून ऑक्टोबर महिन्यातही राज्यात अत्यल्प पावसाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तब्बल ९५ टक्के कमी पाऊस झाला. मराठवाड्यात संपूर्ण महिन्यात जवळपास पावसाचा थेंबही पडला नाही.
या भागात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातही ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा ९५ टक्के कमी पाऊस झाला.