Wed, July 6, 2022

एकनाथ खडसेंना झटका! ईडीकडून जावयाची मालमत्ता जप्त
Published on : 26 August 2021, 1:02 pm
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadses) यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या जावईची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. गिरीश चौधरी असे त्याचे नाव असून पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात (Pune land deal case) ईडीने ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने बुधवारी ही मालमत्ता जप्त केलीये. जप्त केलेल्या मालमत्तेबाबत लवकरच ईडी खुलासा करणार असल्याचेही समजते.
एएनआयच्या वृत्तानुसार, ईडीने फेमा, 1999 च्या तरतुदींनुसार पीसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NBFC) च्या पेमेंट गेटवेसह बँक खाती आणि व्हर्च्युअल खात्यांमध्ये असलेले 106.93 कोटी रुपये जप्त केले आहेत.
Web Title: Maharashtra Ed Action Ncp Leader Eknath Khadses Son In Law Pune Land Deal Case
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..