Eknath Shinde: ''मी मुख्यमंत्री असताना बेळगाव प्रश्नावर...'' एकनाथ शिंदेंनी सांगितली आठवण
Karnataka Government: बेळगावमध्ये आज मेळावा होऊ दिला नाही, दडपशाही केली, माजी आमदार, महापौर यांना दाबण्याचा प्रयत्न केला केला. याचा जाहीर धिक्कार, निषेध आहे. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता बेळगावमधील मराठी माणसाच्या मागे खंबीर उभी आहे.
Belgaum: महाराष्ट्र एकीकरण समितीचा होणारा मेळावा रोखल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद पडले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्ट शब्दात कर्नाटक सरकारचा निषेध केला.