
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव हा काँग्रेसचा अहंकार, गैरव्यवस्थापन आणि वैचारिक विरोधाभासामुळे झाला. त्यांचे पोकळ नेतृत्व, दूरदृष्टीचा अभाव आणि अपयशी कारभारामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारले. सत्याला सामोरे जाण्याऐवजी काँग्रेस पक्ष वायनाडमध्ये प्रियंका गांधींची जागा जिंकण्यात व्यस्त होता, यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीत मविआ उद्धस्त झाली, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. गांधींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांच्यासाठी पक्षापेक्षा कुटुंब महत्वाचे आहे आणि राष्ट्रापुढे पक्ष आहे. लोकसभेत केलेल्या बेताल वक्तव्यांबाबत राहुल गांधी यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.