esakal | राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे | strike
sakal

बोलून बातमी शोधा

Strike

राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : गेली पंधरा-वीस वर्षे काम करत असून आता तरी नोकरीत कायम करून घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांच्याकडे करीत राज्यातील विविध भागांतून आलेले कंत्राटी वीज कामगार (electrical workers) आझाद मैदानात (azad maidan) धरणे आंदोलन (strike) करीत आहेत. मुंबईसह पुणे, नागपूर, विदर्भ, मराठवाडा, कोकण येथून कामगार आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

हेही वाचा: मुंबई : मालवणीत महिलांच्या पायाला त्वचारोग

मुंबई विद्युत सहायक भरतीप्रक्रिया झाल्यानंतर महावितरणमधील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, महापारेषण कंपनीमध्ये स्टाप सेट अपच्या नावाखाली कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना तत्काळ हजर करून घेण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे, त्यांना शास्वत रोजगारांची हमी देण्यात यावी, सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, तसेच त्यांच्या सेवा काळानुसार त्यांना वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात यावी, अशा विविध मगण्या त्यांनी केल्या आहेत.

सहभागी आंदोलक
प्रभाकर लहाने, प्रशांत ननोरे, नितीन चव्हाण, राहील शेख, अतुल थेर, विकी कावळे, कुणाल जिचकार, अनिवेश देशमुख, विकास लांजेवार, स्वप्नील सोनसकर, तुषार चांभारे, राहुल रणदिवे, प्रफुल्ल केणेकर, अंकुश मलोडे, अतुल पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

loading image
go to top