
अविनाश साबापुर
यवतमाळ : ‘महाराष्ट्राचा बिहार झाला का?’ हा प्रश्न गेल्या काही महिन्यांतील घटनांमुळे चर्चेत आहे. ही अवस्था ‘गुड गव्हर्नन्स’ (सुशासन) अहवालातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या अहवालानुसार, राज्यातील ३६ पैकी तब्बल ३२ जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झाले आहेत.