

Maharashtra FDA action: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरातील खाद्य व्यवसायांविरोधात मोठी कारवाई केली आहे. Blinkit आणि Zepto शी संबंधित आस्थापनांसह एकूण 105 खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी राज्यभर ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.