राज्याला पूराचा फटका; 120 नागरिक, 240 जनावरांचा मृत्यू

perilous journey through flood of pregnant women chandrapur
perilous journey through flood of pregnant women chandrapursakal
Updated on

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पुरामुळे नुकसान झालं आहे. तर नाशिक, कोल्हापूर, मुंबई, गडचिरोली या ठिकाणी पावसामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर पुढचे काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची संततघार सुरू आहे.

राज्यात पावसामुळे आणि पुरामुळे जवळपास १२० जणांचा मृत्यू झाला आहे तर २४० जनावरे मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याही बऱ्याच ठिकाणी पुरामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी नागरिकांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून वाहतूक ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानी सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना पावसाचा सर्वात जास्त फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी विरोधीपक्षेनेते अजित पवारांनी केली होती.

पावसाचे पडसाद पुण्यातही पाहायला मिळाले असून मुठा नदीत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर साताऱ्यातील कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुढच्या काही तासांत हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com