
Maharashtra Floods
Sakal
सोलापूर : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी बाधितांना भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आतापर्यंत बुलडाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला मिळाले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नाही, अशी स्थिती समोर आली आहे.