
CM Devendra Fadnavis: राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे ६५ लाख हेक्टरवली पिकांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या, शेतकरी मृत पावले, जनावरं दगावली, घरामध्ये पाणी शिरलं, संसार वाहून गेले; त्यामुळे शेतकरी अक्षरशः दशोधडीला लागला. साधारण ५० लाख शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मंगळवारी, (दि. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.