मुंबई @24×7; 27 जानेवारीपासून जगा 'नाईट लाईफ'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

आदित्य ठाकरे म्हणाले :
- मुंबई 24 तास ही योजना होती, ती जीआर प्रमाणे सुरू ठेवायला हवे होते
- ऑनलाइन प्लॅटफॉर्म डिलिव्हरी 24 तास सुरू असतात
- मुंबई 24 तास धावते, नाईट शिफ्ट करणारे लोक आहेत
- 10 नंतर भूक लागली तर जायचा कुठे? शॉपिंग, पिक्चर काहीच करू शकत नाही
- पुरुष, महिला सुरक्षित फिरतात

मुंबई : मुंबईत नाईट लाईफला राज्य मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे रोजगार व महसूल वाढीसाठी मदत होणार आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाईट लाईफ या महत्त्वाकांक्षी विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. 27 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार असून, सुरवातीला काही अटी असणार आहेत. आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, की मॉल आणि मिल कंपाउंडला मंजुरी दिलेली आहे. मुंबईत तीन शिफ्टमध्ये काम व्हावे, असे वाटते. रहिवाशी भागातील अनेक दुकाने बंद राहतील. मागच्या सरकारमध्ये योजना प्रलंबित होती. पण, आता हा प्रश्न सुटला आहे. आता रात्रभर नागरिकांना सर्व काही खरेदी करता येणार आहे. मुंबई हे 24 तास जगणारे शहर आहे. अनेक मंत्र्यांनी या योजनेचे कौतुक केले आहे. मुंबई हे सर्वांत सुरक्षित शहर आहे. महसूल, रोजगारासाठी या योजनेचा फायदा होणार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले :
- मुंबई 24 तास ही योजना होती, ती जीआर प्रमाणे सुरू ठेवायला हवे होते
- ऑनलाइन प्लॅटफॉर्म डिलिव्हरी 24 तास सुरू असतात
- मुंबई 24 तास धावते, नाईट शिफ्ट करणारे लोक आहेत
- 10 नंतर भूक लागली तर जायचा कुठे? शॉपिंग, पिक्चर काहीच करू शकत नाही
- पुरुष, महिला सुरक्षित फिरतात
- पर्यटक येतात ते 36 तासात जातात
- मुंबईचा रेव्हेन्यू वाढवायचा असेल तर हे होणं गरजेचं आहे
- थिएटर्स, सीसीटीव्ही लावणार दुकाने अशा गोष्टी 24 तास खुले राहणार
- काही लोक 6 दिवस, काही लोक 5 दिवस, तर काही जण 18 तास असेही खुले ठेऊ शकतात
- सणांच्या काळात रात्रभर फिरतात
- टॅक्सी, बसेस हळूहळू सुरु राहतील
- महाविकास आघाडी जनतेचे सरकार आहे
- केंद्रातील भाजप पाहिलं तर तरुणांच्या विरोधात आहे
- डिसीपीसोबत बोलून ट्राफिक चा प्रश्न उद्भवणार नाही याची खात्री घेती आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government cabinet approves night life in Mumbai