मुंबई : ‘‘शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे. पुढील एक महिन्यात या संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’’ अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.