मुंबई- भारतीय प्रशासकीय सेवेतील नऊ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी दिला. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदी केली आहे.