
मुंबई : एकीकडे आर्थिक परिस्थितीचे कारण देत लाडक्या बहिणींना २,१०० रुपये नाकारणारे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी फेटाळणारे राज्य सरकार ‘जल जीवन मिशन’ची सुमारे दोन हजार कोटींची लोकवर्गणीसदानंद पाटील मात्र माफ करण्यास सज्ज झाले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र देऊन जिल्ह्यातील पाणी योजनांच्या लोकवर्गणीची माहिती मागवली आहे. दरम्यान पाणी पुरवठा विभागाच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आता काय भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे.