Maharashtra rain forecast: उन्हाचा कडाका बस्स..! , राज्यभरात आता विजांसह पावसाचा इशारा

Monsoon update: हवामान विभागाने 'या' जिल्ह्यांसाठी दिलाय ‘Yellow Alert’! जाणून घ्या, उद्या कुठं किती पाऊस पडणार?
Monsoon Update
Monsoon Updatesakal
Updated on

IMD Issues Yellow Alert Across Maharashtra: हवामान विभागाने उद्यासाठी (२० जुलै) राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या प्रमाणाबाबत इशारा दिलेला आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तवत सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.

तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, राज्याच्या उर्वरीत भागात विजांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तवला गेला आहे. मागील काही दिवसांमध्ये पावासाने काहीशी उघडीप दिली होती, तर अनेक ठिकाणी उन्हाचा चटकाही जाणवला. त्यानंतर आता हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामध्ये रविवार(२० जुलै) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली, पूर्व कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.

Monsoon Update
Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

तर आज (शनिवारी) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या आहेत. पावसाची उघडीप असल्याने राज्याच्या विविध भागांत उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्याने घामटा निघत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली.

Monsoon Update
Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

'या' जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा -

कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांसह पावसाचा इशारा अर्थात येलो अलर्ट दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com