Weather Update: राज्यासह देशभरात आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update
Weather UpdateEsakal
Updated on

देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तर भारतात पावसाने धुमाकुळ घातला आहे. दरम्यान, हा आठवडा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

तर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  (Marathi Tajya Batmya)

Weather Update
Koyna Dam Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना धरण क्षेत्रात पावसाची 'अशी' आहे स्थिती, पूर्व भागातही जोर कायम

पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. तर आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

Weather Update
Rain Update : पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; राधानगरी, तुळशी, वारणा धरणांत किती आहे साठा?

दरम्यान पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सलग पाऊस नसला तरी अधून मधून मुसळधार सरी बरसत आहेत. (Marathi Tajya Batmya)

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा त्यांनी इशारा दिला आहे.पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अजूनही सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र या आठवडाभरात हा पण बदल होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.(Marathi Tajya Batmya)

Weather Update
Monsoon Update : सिंधुदुर्गात वरुणराजाचं जोरदार 'कमबॅक'; 17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com