
पाली : काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीच्या सुमारास जोरदार हजेरी लावली होती. गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी झाडे आणि विजेच्या तारा कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.