परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईबाबत गृहमंत्री म्हणाले की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deelip Walse Patil

परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईबाबत गृहमंत्री म्हणाले की...

मुंबई : खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) कांदिवलीतील क्राईम ब्रांच युनिटसमोर गुरुवारी हजर झाले आहेत. दरम्यान, सिंह यांच्यावर त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांसाठी कशाप्रकारची कारवाई केली जाईल असे विचारले त्यावेळी वळसे पाटील यांनी अतिशय सूचक असे विधान केले आहे.

वळले पाटील म्हणाले की, “परमबीर सिंह यांच्यावर पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच याबाबतचा पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतरच घेतला जाईल”, असेदेखील दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले. गेल्या जवळपास 9 महिन्यांपासून परमबीर सिंह बेपत्ता होते. अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांच्याविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल झाले होते. यासंदर्भात त्यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावूनही ते हजर न झाल्यामुळे अखेर त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

सिंह यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाने आज रद्द (Thane Court ) केले आहे. तसेच न्यायालयाने ठाणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश सिंह यांना दिले आहेत. सिंह (Parambir Singh) यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध असलेला गुन्हेगारीचा आदेश रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निकाल देताना सिंह यांच्या विरोधातील वॉरंट रद्द न्यायालयाने आज रद्द केला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे सिंह यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

loading image
go to top