राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा; धक्कादायक माहिती समोर: maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis with Eknath Shinde

maharashtra: राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा; धक्कादायक माहिती समोर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच तापलेला आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला असल्याचे एका अहवालातून समजते.(maharashtra karnataka border issue Devendra Fadnavis with Eknath Shinde 150 villages leave Maharashtra )

सीमावर्ती भागातील अनेक गावकऱ्यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी या चार गावांतील नागरिकांनी सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्पुर्वी, सोलापुरातील काही गावांनीही महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा

सांगली जिल्ह्यातील जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी, माडग्याळ, लकडेवाडी, अंकलगी, अंकलगी तांडा, निगडी बुद्रुक, उमदी, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बालगाव, बेळोंडगी, करजगी, बोर्गी, बोर्गी बुद्रुक, अक्कळवाडी, माणिनाळ, गुलगुंजनाळ, मोरबगी, भिवर्गी, कोंत्येवबोबलाद, करेवाडी, तिकोंडी, कागनरी, खंडनाळ, संख, दरीबडची, दरीबडची तांडा, मुचंडी, रावळगुंडवाडी, खोजानवाडी, उमराणी, सिंदूर, बसरगी, गुगवाड, साळमळगेवाडी, वज्रवाड, बिळूर, मेंढेगिरी, वळसंग, कोळगिरी, गुड्डापूर, आसंगी तुर्क, आसंगी बाजार, पांडोझरी, लवंगा, गिरगाव.

तसेच, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुकामधील १३ तर धर्माबाद तालुक्यातील १९ गावांनीही राज्य सरकारला इशारा दिला आहे. उमरी तालुक्यातील २ गावांचाही यामध्ये समावेश आहे.

यासोबतच, चंद्रपूर - महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावे. सोलापूर - अक्कलकोट तालुका - २३ गावे. दक्षिण सोलापूर तालुका - १० गावे इतक्या गावांना महाराष्ट्र नकोसा झाला आहे.