Karnataka Border Dispute : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार बेळगावात; मराठी भाषिकांशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

Karnataka Border Dispute : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार बेळगावात; मराठी भाषिकांशी...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर राज्याचे दोन मंत्री कर्नाटकात चर्चेसाठी जाणार होते त्यांना येऊ नका म्हणून सांगण्यात आले.

अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात आहेत. बेळगावमध्ये जात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. त्यानंतर त्यांनी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आहे. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हेही वाचा: Karnatak Maharasthra Row: कर्नाटकाच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चा एल्गार

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला रोहित पवार यांनी भेट दिली आहे. रोहित पवार यांनी यावेळी बेळगावातील मराठी बांधवांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. दोन्ही राज्यांच्या भूमिका आणि दोन्ही बाजूने टीका यामुळे वाद निर्माण होत असतानाच रोहित पवार यांचा हा बेळगाव दौरा महत्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Karnatak सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक, विनायक राऊत मदतीला धावले