
सोमेश्वरनगरः देशातील साखर हंगामाची आकडेवारी समोर आली असून सलग तीन वर्ष साखरउत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र चालू हंगामात मात्र पुन्हा पिछाडीवर पडला आहे. उत्तरप्रदेशात ८७ लाख टन साखरनिर्मिती झाली असून अद्यापही ४८ कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचा साखर हंगाम संपल्यात जमा असून केवळ ८० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे.