देशातले सर्वाधिक वृक्ष महाराष्ट्रात

Maharashtra is the largest tree in the country
Maharashtra is the largest tree in the country
Updated on

मुंबई - विविध प्रकल्पांसाठी वृक्षतोड होत असली, तरी देशातील सर्वाधिक झाडे आहेत ती महाराष्ट्रातच. देशातील अन्य राज्यांना झाडांबाबत महाराष्ट्राने मागे टाकले असून, फळझाडे लावण्याचा राज्याचा वेग नोंद घेण्यासारखा असल्याचे केंद्रीय वन खात्याने नमूद केले आहे.

विविध प्रकारच्या वृक्षांना जगवण्यातही राज्य पुढे आहे. येथील झाडांच्या प्रकाराची पाहणी लवकरच केली जाणार आहे. जंगलाबाहेर वाढलेल्या वृक्षांमध्ये महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली असली, तरी घनदाट जंगलाची टक्‍केवारी मात्र खालावली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, बीड या जिल्ह्यातील जंगलव्याप्त भूभाग कमी झाला आहे. देशातील जंगलांच्या स्थितीची आकडेवारी सादर करणारा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. नागरी भागात विशेषत: मुंबईत अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे खारफुटीचे जंगल मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याची समाधानकारक आकडेवारीही समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांत खारफुटीच्या जंगलात तब्बल ७२ टक्‍के वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वन खात्याने झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत कोट्यवधी झाडे लावली. यातील रोपांचे जगण्याचे प्रमाण उत्तम असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारतर्फे सातत्याने केला जात असतो. महाराष्ट्रात २०१७ मध्ये ९ हजार ८३१ चौरस किलोमीटरचे वृक्षाच्छादन होते. ते २०१९ मध्ये १०.८०६ चौरस किलोमीटर झाले आहे. देशातील एकूण झाडांपैकी ११ टक्‍के झाडे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात १९९० पासून वृक्षलागवडीत उत्तम प्रयत्न झाले आहेत. महाराष्ट्रात लावलेल्या झाडांपैकी ९५ टक्‍के जगतात, असे केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील वनाच्छादन १३ हजार चौरस फुटाने, तर वनाबाहेरील झाडे ५ हजार १८८ चौरस फुटाने वाढल्याचेही पाहणीतून स्पष्ट झाले असल्याचेही  त्यांनी सांगितले.

वृक्ष लागवड मोहिमेचे यश
मेट्रोसारखे पायाभूत प्रकल्प राज्यात सुरू असल्याने तब्बल १३ लाख ४२ हजार ७०३ झाडे पाडली गेली. मात्र, राज्य सरकारने राबविलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेमुळे महाराष्ट्रात झाडांचे प्रमाण वाढले असल्याचे अतिरिक्‍त प्रधान वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com