
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर फसवणूक, ॲट्रोसिटीचा गुन्हा
नोकरीचे व कंपनीत डायरेक्टर म्हणून घेण्याचे अमिष दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे राज्य उपाध्यक्षांसह तिघांनी संगनमत करून कर्जत, डहाणू व चिंचलखैरे येथील आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्या. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील एफ सी रोडवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई
एफ सी रोड वरील फुटपाथ वर असलेल्या विविध स्टॉल वर आज कारवाई करण्यात आली या कारवाईत अतिक्रमण विभागाने या ठिकाणी असलेले साहित्य जप्त केले आहे.
पुण्यातील एफ सी रोड वर अनिधकृतपणे अनेक व्यावसायिक कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, चप्पल, बुट, दागिने, शो च्या वस्तू विक्री साठी दाखल होतात.
फुटपाथ वर हे लोकं ठिय्या मांडून व्यावसाय करत असल्याने नागरिकांना चालण्यास अडथळा येतो. दरम्यान, हे लोकं रोड वर देखील अनेक गोष्टी विक्री करत असल्याने रोड वर वाहतूक कोंडी होत असते. या विरोधात पुण्यात अनेक आंदोलनं देखील झाली होती. आज देखील पतीत पावन संघटनेचे 'अतिक्रमण हटाव ' आंदोलन होते. याआधीच महानगरपालिकेने येथे कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर निलेश राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान घडली. राहुल मगर या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंट @राहुलमगर32 याने भाजप चे माजी खासदार नीलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डल @meNeelesNRane यावर अश्लील भाषेत ट्विट केले होते. तसेच ठाण्यातील शिवानी गोखले नावाच्या महिले बद्दल देखील या राहुल मगर नावाच्या व्यक्तीने ६ मार्च रोजी ट्विटर वर अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत ट्विट केले होते. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणी राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, एक जण जागीच ठार
पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारणे रिक्षाला उडवल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या या अपघातात कारने पाठीमागून रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत.
येत्या दोन महिन्यात राणेंचं मंत्रिपद जाणार - आमदार नाईक
नारायण राणे यांचं राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नाही. त्यामुळं राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला.
सांगलीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सांगलीत मोर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोर्चात सहभागी झाले आहेत. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून हा मोर्चा निघाला आहे.
होळी खेळत असतानाच तेजप्रताप यादव यांच्या घरात चोरी
पाटणा : बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आलीये. वास्तविक, ही घटना होळी दरम्यानची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजप्रताप यादव एकीकडं होळी (Holi Festival) खेळत होते, तर दुसरीकडं त्यांच्या सरकारी निवासस्थानातून 5 लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
कसोटीत 1206 दिवसांनी विराटच शतक
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक ठोकले आहे. हे विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक असून कसोटी क्रिकेटमधील त्याचे 28वे शतक आहे.
पाऊस कमी झाला तरी पाणी कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करू - देवेंद्र फडणवीस
सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल.
पाऊस कमी झाला तरी पाणी कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करू
गावागावात क्रांती घडत आहे
नैसर्गिक शेतीवर भर दिला पाहिजे
अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक, आई स्नेहलता यांचं निधन
अभिनेत्री माधुरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आई स्नेहलता यांचं आज सकाळी 8.40 वाजता निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर अर्टिका गाडीचा हा अपघात झाला. या वाहनातून अकरा जण प्रवास करत होते, तर यातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून, शेगावकडे निघाली होती.
वाढदिवसानिमित्त केक किंवा बुके आणू नका, रवींद्र धंगेकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
वाढदिवसा निमित्त केक किंवा बुके आणू नका, कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
केक ऐवजी पुस्तक भेट द्या, धंगेकर यांची भावना
रवींद्र धंगेकर यांचा आज वाढदिवस आहे
भारतातील ११ संत महंत व शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा आज कसबा पेठेत आयोजित केल्यामुळे, धंगेकर यांचे आवाहन
धार्मिक कार्यक्रमाचे पावित्र्य राखण्यासाठी केक किंवा बुके आणू नका. केक ऐवजी पुस्तक भेट द्या, धंगेकर यांची कार्यकर्त्यांना विनंती
आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात
पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असललेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात आलं आहे. या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे ला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर