Marathi News Update : मंत्रिमंडळ विस्तार अन् इतर राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Update : मंत्रिमंडळ विस्तार अन् इतर राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढणार- राज ठाकरे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज खेडमधून केली आहे.

फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

२४ तासांमध्ये अजित पवार गटाला खातेवाटप होणार

पुढील २४ तासात अजित पवार गटाला खातेवाटप केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. वित्त खात्याबाबत अजून चर्चा सुरू असून त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता सूत्रांनी दिली.

बारामतीमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन

भाजपच्या वतीने बारामतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

फडणवीस, अजित पवार, तटकरे यांच्यात २० मिनीटे चर्चा

फडणवीस, अजित पवार, तटकरे यांच्यात २० मिनीटे चर्चा झाल्याची माहीती आहे.

बीडमध्ये धनंजय मुंडेंचे जोरदार स्वागत

बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. क्रेनच्या सहाय्याने त्यांना हार घालण्याता आला तसेच जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.

आमचा पक्षाचं उपरणं रेडी; मविआमधून कोणी येत असेल तर स्वागत - चंद्रशेखर बावनकुळे

आमचा पक्षाचं उपरणं रेडी आहे. मविआमधून कोणी येत असेल तर स्वागत आहे. काँग्रेसमधून जे कोणी येतील त्यांच स्वागत असेल. मविआमध्ये जे आता उरले आहेत त्यांना आमच्याकडे यायचा आहे त्यांच स्वागत आहे. त्यांच्यासाठी पक्षाचं उपरणं हे रेडी आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे

एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात दिड तास चर्चा

दीड तासांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस वर्षावरून निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात दिड तास चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री अजित पवार अद्यापही वर्षां बंगल्यावर उपस्थित आहे.

धनंजय मुंडे परळीत दाखल 

धनंजय मुंडे परळीत दाखल झाले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात दाखल झाले आहेत.

बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे- बच्चू कडू 

राज्यात बदलत असलेल्या राजकारणाचा मला कंटाळा आला असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. त्यांनी आज मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याचं जाहीर केलं आहे.

मंत्रीपदाच्या शर्यतीतून बच्चू कडू यांची माघार

मंत्रीपदाच्या शर्यतीतून बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. मंत्री पदावर दावा सांगणार नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. परंतु ते शिंदे-फडणवीस यांच्यासोबतच राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे.

दिल्ली वाले महाराष्ट्राची मजा पाहत आहे- संजय राऊत

दिल्ली वाले महाराष्ट्राची मजा पाहत आहे दिल्ली वाल्यांना महाराष्ट्राच्या नेत्यांचा छंद जडलेला आहे. नेत्यांना आपल्या नेत्यांकडे आपल्या मातीतल्या नेत्यांकडे जाणे फार अडचणीचं वाटत होतं आम्हाला वेळ देत नाही आमचं ऐकलं जात नाही मग आता तुम्ही दिल्लीत का फेऱ्या मारता असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.

नवाब मालिक यांना हायकोर्टाचा दणका! जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला 

नवाब मालिक यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. हायकोर्टाने जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप अजित पवारांच्या भेटीला

पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला देवगिरीवर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अजित पवार यांच्या भेटीला देवगिरीवर दाखल झाले आहेत.

राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. तर दिल्लीतही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये येत्या 48 तासांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे दिल्लीला पुराचा विळखा पडला आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी आज 207.55 मीटरवर गेली आहे. 1978 सालचा यमुना नदीचा 207.49 मीटरचा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे

बच्चू कडू यांना मंत्रिपद नाही?, सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार

मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. पण मी अमरावतीतच आहे. आता मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही हे मी सकाळी 11 वाजता जाहीर करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.

PM मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, नॅशनल डे परेडमध्ये होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांना बॅस्टिल डे परेडच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. १४ जुलै रोजी या परेडला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com