विधानसभा अध्याक्षांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं ते फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स
devendra fadnavis
devendra fadnavis Sakal

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे त्यावर चर्चा सुरू आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले आहे त्यावर ही चर्चा होईल. त्याच बरोबर मंत्रिमंडळ विस्तार बाबत महत्वाची चर्चा होणार, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई एनसीबीने जप्त केले 135 कोटी रुपयांचे ड्रग्ज

मुंबई एनसीबीने 6 किलोपेक्षा जास्त वजनाचे कोकेन आणि अल्प्राझोलमसह 135 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. एनसीबीने या प्रकरणी नऊ जणांना अटक केली असून त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे: एनसीबी, मुंबई

MMRDA मध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा; पोलीस घटनास्थळी दाखल

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची मिझोराम निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भाजपने पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची मिझोराम निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. यंथुंगो पॅटन, उपमुख्यमंत्री नागालँड आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल अँटनी निवडणूक सह-प्रभारी म्हणून.

'असा' असेल PM मोदींचा मुंबई दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजता त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ६ ते ८ जिओ वर्ल्ड येथील कार्यक्रमाला तेउपस्थित राहतील. ८ नंतर पुन्हा दिल्लीसाठी रवाना होतील.

मेट्रो कार डेपो आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गला हलवावा - आदित्य ठाकरे

"मेट्रो कार डेपो आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गला हलवावा, अशी आमची मागणी आहे. आमच्या महाविकास आघाडी सरकारनेही तसा निर्णय घेतला आहे. पण, हे लोक (एकनाथ शिंदे-भाजप) ने आमचे सरकार पाडण्याचा निर्णय घेतला आणि आधी मेट्रो कार डेपो कांजूरमार्ग ते आरे कॉलनी येथे हलवण्याचा निर्णय घेतला. तसेच, राज्यातील घटनाबाह्य सरकारने मेट्रोच्या चार वेगवेगळ्या मार्गांसाठी चार वेगवेगळे कार डेपो बांधणे आणि चार वेगवेगळ्या कंत्राटदारांची नियुक्ती करणे सुरू केले आहे. यामध्ये राज्याचे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्षामुळे जातीय समाजाचा तिढा; फडणवीसांचा आरोप

विरोधी पक्षामुळे जातीय समाजाचा तिढा निर्माण होत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

जगदंब तलवार भारतात आणण्यासाठी पत्रव्यवहार झाला; मंत्री मुनगंटीवारांची माहिती

इंग्लड येथून पुढच्या महिन्यात शिवरायांची वाघनखं भारतात येणार आहेत. यादरम्यान जगदंब तलवार देखील भारतात आणण्यासाठी पत्रव्यवहार झाला असून पाठपुरावा झाला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत ज्या सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष देत असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

पुढच्या निवडणुकीच्या आधीच निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाला फटकारलं

पुढच्या निवडणूका येण्यापूर्वी निर्णय घ्या, तुम्ही निवडणुकांसाठी थांबला आहेत का? असा सवाल देखील न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केला आहे. तसेच अध्यक्षांना मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही प्रकरणांमध्ये वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर सर्वोच्च न्यायालय नाराज

विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराज व्यक्त केली आहे. प्रकरण गांभीर्याने घ्यावे, प्रकरण लांबत का चाललं आहे असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

अपात्रतेवर पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा- सरन्यायाधीश

अपात्रतेवर पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्याबाबत दिरंगाई करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटासह, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याबाबत सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवादात सुरू आहे. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे सुनावणीसाठी उपस्थित आहेत.

पुण्यात शिक्षकांचा सरकारविरोधी मोर्चा; रोहित पवार, रविंद्र धंगेकर मोर्चात सहभागी

पुण्यात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सरकार विरोधात मोर्चा काढला आहे. सरकारच्या शिक्षण आणि शिक्षक धोरणांच्या विरोधात शिक्षक कृती समिती आक्रमक झाली आहे. या मोर्चामध्ये आमदार रोहित पवार आणि रविंद्र धंगेकर सहभागी झाले आहेत.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी थोड्याच वेळात होणार सुरू

आमदारांच्या अपात्रते संदर्भात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे. सुनावणीपूर्वी ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अनिल परब सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील कोर्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरेंच्या निवासस्थानी टोलसंदर्भात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

टोलसंदर्भात आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.

पुढच्या पंधरा दिवसात सर्व एन्ट्री पॉईंटवर राज्य सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावण्यात येणार आहेत.टोल नाक्यावर पोलीस तैनात केले जातील. 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही. मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार. PWD चे 29, तर MSRDC चे 15 जुने टोलनाके बंद करण्याची मागणी करण्यात येईल. आनंदनगर किंवा ऐरोली एकाच ठिकाणी टोल भरावा. डिजीटल बोर्ड लावून किती टोलवसूली झाली याची माहिती दिली जाईल. नागरिकांना तक्रारींसाठी टोलनाक्यावर नंबर पुरवला जाईल.उड्डाणपूल , भुयारी मार्गांचे आयआयटीकडून ऑडिट केले जाणार.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दादा भुसेंमध्ये टोलबाबत सकारात्मक चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दादा भुसेंमध्ये टोलबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. खराब रस्ता असलेल्या ठिकाणी टोल आकारणे आणि येलो लाईन नियमाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. या विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेत राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यात एका तासांपासून बैठक सुरू

मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यात एका तासांपासून बैठक सुरू आहे. कालच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले असले तरी पुढील निर्णय आजच्या बैठकीत होणार आहेत.

टोलबाबत गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीनंतर आज शिवतीर्थावर पुन्हा बैठक

टोलबाबत गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीनंतर आज शिवतीर्थावर पुन्हा बैठक सुरू झाली आहे. मंत्री दादा भुसे, MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे देखील शीवतीर्थावर दाखल झाले आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. ऑपरेशन अजय यशस्वी. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com