News Updates: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Breaking News LIVE: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
sakal breaking notifiction
sakal breaking notifiction

महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात- फडणवीस

महानगरपालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी पुण्यात बोलताना हे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र हादरला! 3 महिन्यात 3500 हजार मुली बेपत्ता

महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात जवळपास 3500 पेक्षा जास्त महिला बेपत्ता आहेत, असं महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर दिसून येतंय.

पालकमंत्री विखे दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल

शेगावमध्ये झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अहमदनगरचे पालकमंत्री विखे  पाटील पोहचले आहेत.

गौतमी पाटील विरोधात पोलिसात तक्रार, वाचा प्रकरण

सतत चर्चेत असणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गौतमी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याच प्रकरणात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या एका आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर- Gautami Patil : गौतमीने माझी फसवणूक केली! बार्शीत आयोजकाकडून तक्रार दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत दाखल झाले आहेत. ब्रिटनचा दौरा संपवून ते राज्यात परतले आहेत.

फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 2 जण गंभीर जखमी  

धारशिव मधील तेरखेडा गावात फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालं आहे.

राज्यातील दंगलीला राज्य सरकारने आवर घालावा - अजित पवार 

राज्यातील दंगलीला राज्य सरकारने आवर घालावा असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दंगलींचे प्रमाण वाढले आहे. या घटनांना आवर घालावा असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे

राज ठाकरेंकडून "पै फ्रेंड्स लायब्ररीत" जाऊन केली पुस्तकांची पाहणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली मधील प्रसिद्ध "पै फ्रेंड्स लायब्ररीत" जाऊन पुस्तकांची पाहणी केली. लायब्ररीची पाहणी करत पै फ्रेंड्स लायब्ररीच्या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न,प्रशासनाचा आरोप

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले आहे. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे.

सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे. आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे उपाध्यक्षांना दिल निवेदन 

ठाकरे गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन देण्यात आलं आहे. एकूण 79 पानांचे ही निवेदन आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या चौकटीत निर्णय घ्यावा असं आवाहनही ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.

2004ची हिंसाचारात भडकवण्यात कोणाचा हात? ठाकरेंची नार्कोटेस्ट करा

2004ची हिंसाचारात भडकवण्यात कोणाचा हात? उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा असं नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.

विश्रांतवाडीतील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात मुलाची आत्महत्या

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोरील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या. आज सकाळी १०.३० वा. सुमारास घटना.

मविआत ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारांसारखी; नितेश राणेंची जहरी टीका

मविआत ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारांसारखी असल्याची जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. भाजपसोबत असताना उद्धव ठाकरेंना सन्मान होता. भाजपसोबत असताना मातोश्रीवर भाजपचे बडे नेते, अभिनेते येत होते. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचा सन्मान कमी झाला. खुर्चीवरून कधी स्टूलवर बसवतील अशी भीती आहे असं नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शरद पवारांच्या भेटीला 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सत्तसंघर्षाच्या निकालावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे खडकवासला धरण परिसरात 9 मुली बुडाल्या 

खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या असता जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले तर दुर्दैवाने अंदाजे सोळा ते सतरा वयाच्य दोन मुलींचा शोध लागला नाही.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा 'ईडी'ची नोटीस

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना पुन्हा ईडीने समन्स पाठवले आहे. २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता.


'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्वीट करत दिली माहिती

'द केरळ स्टोरी' या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव द्या, देवेंद्र फडणवींसाची मागणी

वांद्रे- वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे पत्र 13 मार्च रोजी लिहिले होते. या पत्रात त्यांनी कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी अशी विनंती केली होती.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com