Marathi News Updates : विरोधकांसह NDAची बैठक ते पावसाळी अधिवेशनातील घडामोडी, एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Marathi News Updates : विरोधकांसह NDAची बैठक ते पावसाळी अधिवेशनातील घडामोडी, एका क्लिकवर...

राज्यात 45पेक्षा जास्त जागा निवडून आणू- मुख्यमंत्री शिंदे

देशात 350 पेक्षा जास्त आणि राज्यात 45 पेक्षा जास्त जागा NDA जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही एकत्र असू आणि मोठं यश मिळवूवन देवू. एनडीएच्या बैठकीत सगळ्या नेत्यांना 10 ते 15 मिनिट बोलण्याची संधी दिली त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मत व्यक्त केलं.

सोनिया गांधी, राहुल गांधींच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. खराब हवामानामुळे भोपाळमध्ये विमानाचं लँडिंग करण्यात आलेलं आहे. भोपाळ पोलिसांनी ही माहिती दिली.

ही लढाई 'इंडिया'विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे- राहुल गांधी

देशातल्या विरोधकांची एकजुट झालेली आहे. देश वाचवण्यासाठी ही लढाई सुरु झालेली असून नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात हा लढा असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

विरोधकांची पुढची बैठक मुंबईत होणार

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं, त्याचं काय? -  बाळासाहेब थोरात

एक रुपयात विमा ही चांगली घोषणा आहे. परंतु अंमलबजावणी कशी झाली, त्यासाठी काय काय करावं लागतं, हे पाहावं लागेल. खरं तर लोकांचा प्रियियम विषय नव्हता. ज्या कंपन्या फसवत आल्या, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र सदनात पोहचले

नवी दिल्ली : एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पोहोचले आहेत. आज नवी दिल्ली येथे एनडीएच्या घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी भाजपच्या सर्व मित्रपक्षांचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असताना दृश्य मानता कमी झाल्यामुळे वाहन चालकांना वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. परिणामी अंधेरीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विलेपार्ले पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडल्या जाणारा आणि विमानतळा कडून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे येणाऱ्या दोन्हीही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न देखील केला जात आहे.

मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करा - आमदार अस्लम शेख

दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाड मार्वे समुद्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा विचार करता तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावी, अशी मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह सोमवारी दुपारपर्यंत सापडले. .

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी तातडीने मार्वे समुद्र किनारी सागरी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

आधार कार्ड अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही- दीपक केसरकर

राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहे. राज्य सरकारने लेखी उत्तरात विधान परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 आधारकार्ड वैध ठरले आहेत. आधार कार्ड अवैध ठरले असले तरी विद्यार्थांना योजनापासुन वंचित ठेवण्यात येणार नाही अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. या विद्यार्थांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी यंत्रणा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात एसटी बसला अपघात; १३ विद्यार्थ्यासह २० जण जखमी

जळगाव जिल्ह्यात एसटी बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात १३ विद्यार्थ्यासह २० जण जखमी झाले आहेत. पाचोरा-मोंढाळा मार्गावर एसटीबस आणि ट्रकचा अपघात झाला.

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंधांच्या संशयावरून  जोगेश्वरीतून दोघांना अटक

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून जोगेश्वरीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश STF आणि महाराष्ट्र एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे. सय्यद आणि अरमान अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत

उत्तर प्रदेशात रविवारी अटक करण्यात आलेला संशियत आयएसआय एजंट मोहम्मद रईस ला मदत केल्याचा दोघांवर संशय आहे. रईसवर पाकिस्तानातील हँडलरला भारतीय लष्करी आस्थापनांची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. जोगेश्वरीतून अटक करण्यात आलेल्या दोघांनी मोहम्मद सलमान सिद्दीक 24 या संशयिताची भरती केल्याचा देखील आहे संशय

विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पवार बेंगळुरू येथे पोहोचले

आज भाजपला रोखण्यासाठी सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बेंगळुरू येथे पोहोचले आहेत. कालपासून देशभरातील विरोधीपक्षाचे प्रमुख नेते बेगळुरू येथे पोहचले असून आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विरोधकांकडून रणनितीवर चर्चा केली जात आहे.

सीमा भारताचं मोठं नुकसान करेल, हे शेवटचं सांगणं; पाकिस्तानहून थेट मुंबईत फोन

सीमा रिंद उर्फ सीमा हैदरला भारतातून काढून टाका, सीमा एक एजंट असल्याचा दावा करणारा मेसेज पाकिस्तानहून मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला आहे. सीमा ही भारताचं मोठं नुकसान करेल हे शेवटचं सांगणं असल्याचा दावा पाकिस्तानमधून आलेल्या मेसेज मध्ये इरफान नावाच्या व्यक्तीने केलेला आहे.

या मेसेजची वस्तुस्थिती आता पोलीस पडताळून पाहत आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानातील सीमा हैदर चांगलीच चर्चेत आहे. प्रियकर सचिन मीणासोबत राहण्यासाठी सीमा पाकिस्तान सोडून नेपाळ मार्गे चार मुलांना घेऊन भारतात आली आहे.

बच्चू कडू आज दिल्लीतून भूमिका स्पष्ट करणार

आज दिल्ली येथे NDA घटकपक्षांची बैठक दिल्ली येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा आरपीआय (आठवले गट) यांनाही बैठकीच निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहाणार आहेत.

दरम्यान बच्चू कडू हे आज दिल्लीतून एनडीएत राहण्याबद्दल त्यांचू भूमिका स्पष्ट करणार आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com