आशिष देशमुखांचा भाजप प्रवेश ते मनिषा कायंदे यांचा शिवसेना प्रवेश; दिवसभरातील प्रत्येक अपडेट

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
आशिष देशमुखांचा भाजप प्रवेश ते मनिषा कायंदे यांचा शिवसेना प्रवेश; दिवसभरातील प्रत्येक अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनीषा कायंदे यांचा पक्षप्रवेश

आमदार मनीषा कायंदे ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत. प्रवेशासाठी त्या ठाण्यातल्या आनंद आश्रम येथे पोहोतल्या आहेत.

नागपूरमध्ये मुलांचे मृतदेह सापडले

नागपूरमध्ये कालपासून बेपत्ता असेलले तीन मुलं सापडले आहेत. या मुलांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून फारुक नगरमध्ये एका कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळले.

मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा- देवेंद्र फडणवीस

मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथून केलं आहे. ते म्हणाले की, मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.

दादर परिसरात कार्यालयीन इमारतीला आग

मुंबईतील मध्यवर्ती दादर परिसरात रविवारी सकाळी एका कार्यालयीन इमारतीच्या कार्यालयात आग लागली. कार्यालय बंद असल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दादर पूर्व भागातील स्वामी ज्ञान जीवन दास रस्त्यावरील एका चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात ही आग लागली होती. आगी संदर्भात माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे एक इंजिन आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी काही मिनिटांतच आग विझवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अजित पवारांनी केलं तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामती येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं सारथ्य केलं.

मुंबईवर कब्जा करणाची भाषा बंद करा- राऊत

भाजपच्या लोकांनी मुंबईवर कब्जा करण्याची भाषा बंद करा, हिंमत असेल तर मुंबई महानगर पालिका आणि इतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ दाखवा, असं आवाहन संजय राऊतांनी केलं.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा शिवसैनिक फार काळ उध्दव ठाकरेंसोबत राहू शकत नाही- प्रविण दरेकर

ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहीती समोर आली आहे. त्यावर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं कि, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक फार काळ उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवली. शरद पवारच्या आंजोळीने पाणी पिलं. यातून शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे तो एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहे, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

ज्ञानोबा माउलींच्या पादुकांचं निरा स्नान संपन्न

ज्ञानोबा माउलींच्या पादुकांचं निरा स्नान संपन्न झालं आहे. वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

आमदार मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असणाऱ्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहीती आहे. तर मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उडती पाखरं स्वार्थासाठी येतात, स्वार्थासाठी जातात- संजय राऊत

उडती पाखरं स्वार्थासाठी येतात, स्वार्थासाठी जातात असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा कायंदे यांचा फोन नॉटरिचेबल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. यावर राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

आणखी एका आमदाराचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र; वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला धक्यावर धक्के

सत्तासंघर्षानंतर पक्षांमध्ये इन आऊट सुरु आहे. अशात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा कायंदे यांचा फोन नॉटरिचेबल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसचे, ३ माजी नगरसेवकदेखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

गंगाधाम आईमाता मंदिराजवळ गोडाऊनमध्ये भीषण आगीची घटना

गंगाधाम आईमाता मंदिराजवळ एका गोडाऊनमध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आशिष देशमुख यांचा आज भाजप प्रवेश

काँग्रेस मधून हकालपट्टी केलेले नेते आशिष देशमुख आज नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचा राज्यव्यापी मेळावा 

शिवसेना ठाकरे पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून सहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहेत. राज्य सरकारला 30 जूनला एक वर्ष पुर्ण होणार असताना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न आहे. त्यामुळे आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये विस्ताराची यादी आणि तारीख ठरणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.

जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये 24 तासांत पाच वेळा भूकंप

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गेल्या 24 तासांत पाच वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. तर जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजता पहिला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. लेहमध्ये भूकंपाचा दुसरा हादरा जाणवला. हा भूकंप शनिवारी रात्री 9.44 वाजता झाला असून त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. तिसरा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता झाला, या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी होती.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com