Marathi News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE marathi latest news Marathi Breaking News Mumbai live Updates Latest Marathi News Headlines Marathi News Headlines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Marathi News Updates :  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

नवी मुंबईच्या ऐरोलीत बस जळून खाक, कारण अद्याप अस्पष्ट

नवी मुंबईतील ऐरोलीत एका बसला आग लागली ज्यामध्ये बस जळून खाक झाली आहे. ऐरोलीच्या सेक्टर ८मध्ये ही घटना घडली. अग्मिशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचाही दिवस चांगला, ७ पदकांची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताने ९ पदकांची कमाई केली आहे.

व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद मागे घेतला, उद्यापासून लिलाव सुरु होणार

काही दिवसांपासून कांदा लिलाव बंद होते. व्यापाऱ्यांनी कांदा लिलावर बंदी घातली होती. व्यापाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय मागे घेतला. बुधवारपासून कांदा लिलाव पुन्हा सुरु होतील.

वंदे भारत ट्रेनचा अपघात टळला, समाजकंटकांनी रुळावर ठेवले होते दगड

वंदे भारत ट्रेनचा मोठा अपघात टळला आहे. राजस्थानच्या भिलवाडा या ठिकाणी काही समाजकंटकांनी रेल्वे रुळावर मोठा अपघात घडावा यासाठी मोठे दगड ठेवले होते. मात्र मोटारमनच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला.

आशियन क्रीडा स्पर्धेतील लांब उडी प्रकारात भारतीय महिला खेळाडू टॉप ३ मध्ये

आशियन क्रीडा स्पर्धेतील लांब उडी प्रकारात भारताची महिला खेळाडू सोजन इदापिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. तिची रौप्य पदक जिंकण्याची शक्यता जास्त आहे.

मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावर आणखी एक तास मेगाब्लॉक

मुंबई लोकलने शनिवारी ३८ तासांचा मेगाब्लॉक हार्बर लाईनवर घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा मेगाब्लॉक एका तासाने वाढवण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयात २४ तासांत,२४ रुग्णांचा मृत्यू, नांदेडमधील घटना

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात २४ तासांमध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे.

इंडिया आघाडी मुंबई मोर्चा, परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखली पदयात्रा

फॅशन स्ट्रीट ते मंत्रालय असा इंडिया आघाडीची पदयात्रा सुरु आहे. यावेळी पदयात्रेला परवानगी नसल्यामुळे पोलिसांना ही यात्रा रोखली आहे आणि काही आंदोलनकर्त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

भाजपने राजस्थानला काहीही दिलं नाही, सचिन पायलट यांचा आरोप

राजस्थानमधील काँग्रेसचे नेते सचिन पायलट म्हणाले की, भाजपने राजस्थानसाठी काहीही केलं नाही.

इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड

इंडिया आघाडीचा मोर्चा मुंबईत सुरु आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. यावेळी काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली. फॅशन स्ट्रीट ते मंत्रालय असा हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मुंबईच्या अंधेरी परिसरातील मरोळ येथे एका इमारतीला भीषण आग

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ पाईपलाईन बस स्टॉप समोर असलेल्या मुकुंद हॉस्पिटलच्या इमारतीत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आगीची मोठी दुर्घटना घडली. तळमजल्यावर असलेल्या एटीएम मशीन आणि मेडिकल स्टोरला ही आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून मात्र या आगीमध्ये एटीएम मशीन आणि मेडिकल स्टोर सोबत दोन घर जळून खाक झाले..ही आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयडीसी पोलीस करत आहे

  हार्बर मार्गावरील ३८ तासांचा मेगाब्लॉक तीन तासांनी वाढवला

लोकलच्या हार्बर मार्गावरील ३८ तासांचा मेगाब्लॉक तीन तासांनी वाढवण्यात आला आहे. आता संध्याकाळी चार वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. आधी हा मेगाब्लॉक एक वाजता संपणार होता. दुरुस्तीच्या कामासाटी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता मात्र काम पूर्ण न झाल्याने हा वाढवण्यात आला आहे.

बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर 

बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आली आहे. 2022 साली सरकारने ही जनगणना करण्यात आली होती. काँग्रेससह INDIA आघाडीने देखील जातीय जनगणनेची मागणी केली आहे. 2021 साली होणारी जनगणना अद्याप झालेली नाही. बिहार सरकारच्या जातीय जनगणनेचे आकडे जाहीर करू नयेत यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ती मागणी फेटाळली होती.

इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस...; राज ठाकरेंकडून महात्मा गांधींना अभिवादन

"आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू ह्याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतील ही किंवा नसतील ही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन." असा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महात्मा गांधी यांना अभिवादन केलं आहे.

देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात पोहचले

आज गांधी जयंती असून यानिमीत्ताने वर्धा येथील सेवाग्रम आश्रमात राजकीय नेत्यांकडून भेटी दिल्या जात आहेत. सकाळी सुप्रिया सुळेंनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सेवाग्राम आश्रमात दाखल झाले आहेत. गांधी जयंतीनिमीत्त आश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, फडणवीस या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

पनवेल-वसई दरम्यान मालगाडी घसरल्यामुळे प्रवाशांचे हाल! रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत  

पनवेल-वसई दरम्यान मालगाडी घसरल्यामुळे रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत आहे. कोकणातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या आज ही उशिराने धावत आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासन विभागाने दिली आहे.

सर्व एक्सप्रेस गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत असून सलग तिसऱ्या दिवशी ही प्रवाशांचे हाल होत आहेत. काही एक्सप्रेस मध्यवर्ती ठिकाणी थांबल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 NIAची आंध्र प्रदेश, तेलंगणामधील ६० हून अधिक ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ६० हून अधिक ठिकाणी डाव्या पक्षाच्या अतिरेकी (LWE) प्रकरणी छापेमारी केली.

दिल्ली पोलिसांकडून एका दहशतवाद्याला अटक; NIA ठेवलं होतं तीन लाखांचं बक्षीस

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमने एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी 4 लोकांना ताब्यात घेतलं होतं. शहानवाज उर्फ शैफी उज्जमा याला पोलिसांनी अटक केली आहे. NIA ने शहानवाज वर 3 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. दहशतवादी करवायात त्याचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

देशभरासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात पुणे, मुंबईसह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे. राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

टॅग्स :Maharashtra News