
सत्तासंघर्षावरील सुनावणी ते MPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा; दिवसभरात काय घडलं वाचा एका क्लिकवर
अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; येवढे लाख कोटी पाण्यात
अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याची पाहिला मिळत आहे.
अदानी समूहातील एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 9800 कोटी डॉलरची घसरले आहे.
एकतर्फी प्रेमातून बहिणीला वारंवार प्रपोज, मनात राग धरून भावाने केली तरुणाची हत्या
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला प्रपोज करून लग्नासाठी तगादा लावत असल्याचा राग मनात धरून भावाने केली तरुणाची हत्या.
कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासनेंना धक्का
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा.
पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचलं असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा केल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांपासून ट्रस्टच्या सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आहेत तर उत्सव प्रमुख प्रमुख अक्षय गोडसे हे आहे.
सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली; पुढची सुनावणी 'या' तारखेला
सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर ठाकरे गटाचे वकील येत्या मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी भूमिका मांडणार आहे.
सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली; पुढची सुनावणी 'या' तारखेला
सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा 3 दिवस शक्यता होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे.
आमदारांची कृती पाहता त्यांना अपात्र करायला हवं- सिंघवी
राज्यपालांचे राजकीय लागेबांधे असतात - मनु सिंघवी
पक्षामद्धे फुट गृहीत धरून राज्यपाल वागले - मनु सिंघवी
सभागृहांतील घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो - मनु सिंघवी
राज्यपालांच्या अधिकाराबाबत 10व्या सूचीचा विचार व्हायला हवा
अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू
याच तपशीलाच्या जोरावरच शिंदेंना पक्षचिन्हं आणि नव मिळालं - सिब्बल
याचिका 19 जुलैची, मात्र बैठकीचे तपशील 27 जुलैचे - सिब्बल
एकनाथ शिंदे यांनी आयोगाची दिशभुल केली आणि याच जोरावर त्यांनी पक्षचिन्हं आणि नाव मिळवलं - सिब्बल
बैठकीबाबत कोणालाही सूचित केलं नव्हतं - सिब्बल
इथे प्रश्न केवळ 39 आमदारांचा आहे
म्हणजे 2 गटाबाबत माहिती राज्यपालांना नव्हती - कोर्ट
गोगवले यांची प्रतोद पदावरील नियुक्ती रद्द करा - सिब्बल
आपत्रतेची तलवार असलेल्यांना पक्षचिन्हं दिलं - सिब्बल
ठाकरे गटाच्या आमदारांना दिलेली आपत्रतेची नोटिस रद्द करावी - सिब्बल
भरत गोगवले यांची प्रतोद पदी निवड आसाममधून करण्यात आली - सिब्बल
गोगवले प्रतोद बनल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना आपत्रतेच्या नोटिसा - सिब्बल
तुमचा पक्ष कोणता हा प्रश्न राज्यपालांनी विचारायला हवा होता - सिब्बल
मोठ्या कटाचा भाग म्हणून सर्व आमदार गुवाहाटीला गेले - सिब्बल
सरकार टिकवण्यासाठी त्याच वेळी बहुमत चाचणीची मागणी आवश्यक होती. मात्र मोठा कट, जो आधीपासून रचला गेला - सिब्बल
सिब्बल चुकीचं बोलत आहेत - जेठमलानी
शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांचा सिब्बल यांच्या युक्तिवादावर आक्षेप
कोर्टाच्या निर्णयानंतर पावलं उचलली जायला हवी होती - सिब्बल
राज्यपाल आणि अध्यक्ष यांच्यातील हा दुहेरी पेच - कोर्ट
राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला - सिब्बल
सिब्बल कोर्टाची दिशभुल करत आहेत - जेठमलानी
बहुमत नाही असा प्रस्ताव भाजपने का मांडला नाही - सिब्बल
बंडखोर आमदारांचा शपथविधी होऊ शकतो का? हा मुद्दा आहे - सरन्यायाधीश
पक्षफुटीमुळे सरकार अस्थीर झाले- सरन्यायाधीश
आपत्रतेच्या निर्णयात राज्यपाल हस्तक्षेप करू शकत नाहीत - सरन्यायाधीश
सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिपण्णी
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीकडे बहुमत नव्हतं
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीकडे बहुमत नव्हतं- सरन्यायाधीश
महाविकास आघाडीला अपक्षांचाही पाठिंबा
महाविकास आघाडीला अपक्षांचाही पाठिंबा आहे
कोर्टात बहुमताची आकडेमोड सुरू
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
पक्षाध्यक्ष ठाकरे असताना शिंदे यांना भेटीची वेळ कशी दिली?
कायदेशीर सरकार राज्यपालांच्या निर्णयामुळे पडलं
सरकार स्थापनेसाठी शिंदे भाजप राज्यपालांकडे गेले
राज्यपालांनी बंडखोरांना वैधता दिली
राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं
निर्णय अध्यक्षांनी घ्यावा की नाही, हे पाहण्यात अर्थ नाही
याच कोर्टाने आपत्रतेचा निर्णय घ्यावा
राज्यपालांच्या निर्णयाची समीक्षा व्हावी
राज्यपाल कोणतीही गोष्ट गृहीत धरू शकत नाहीत
राज्यपाल सरकार पडण्यास मदत करू शकत नाहीत.
राज्यपालांनी आमदारांची शरणागती घ्यायला हवी होती का
राज्यपाल कोणतीही गोष्ट गृहीत धरू शकत नाहीत - सिब्बल
राज्यपालांनी सरकार पाडण्यापासून वाचवलं पाहिजे - सिब्बल
राज्यपाल सरकार पाडण्यासाठी मदत करू शकत नाहीत - सिब्बल
घेतलेल्या घटनांची दखल घटनात्मक योग्य नाही? - कोर्ट
राज्यपाल हे घटनात्मक पद, त्यांनी सरकार पडण्यापासून वाचवलं पाहिजे - सिब्बल
पक्षातील फुटीचा सरकारवर परिणाम होतो - सरन्यायाधीश
आमच्याकडे अजूनही बहुमत, त्यांच्याकडे 106 आमदार - सिब्बल
सरन्यायाधीशांचा सिब्बल यांना प्रश्न
अपात्रतेबाबत कल्पना असताना बहुमत चाचणीचे आदेश योग्य नाही का?
महाराष्ट्रात अनेक छोटे पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत असतात - सिब्बल
बहुमत चाचणीची मागणी करतानाच घोडेबाजार सुरू होतो - सिब्बल
सरन्यायाधीशांचा कपिल सिब्बल यांना सवाल
राज्यपालांनी नैतिक घटना पाळायला हवी- सिब्बल
सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिपण्णी
अशा परिस्थितीत बहुमत चाचणी योग्य नव्हती का?
आपत्रतेचा मुद्दा लक्षात घेतला तर बहुमताचा आकडा घटेल
राज्यपालांच्या निर्णयाची समीक्षा व्हावी - सिब्बल
राज्यपालांच्या भूमिकेवर सिब्बल यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्हं
राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं - सिब्बल
याच कोर्टाने आपत्रतेचा निर्णय घ्यावा - सिब्बल
सरकार स्थापनेसाठी शिंदे राज्यपालांकडे गेले -सिब्बल
कायदेशीर सरकार राज्यपालांमुळे पडलं- सिब्बल
अस्तित्वात असलेलं सरकार पाडलं गेलं- सिब्बल
पक्षाध्यक्ष ठाकरे असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना वेळ कशी दिली? - सिब्बल
राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांना झुकतं माप -सिब्बल
राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरवात; ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू
राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरवात झाली आहे. सुरवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.
MPSC विद्यार्थी अन् मुख्यमंत्र्यांची भेट अचानक रद्द
MPSC विद्यार्थी अन् मुख्यमंत्र्यांची भेट अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी सुनावणी
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू राहणार आहे. दोन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर आज शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर