News Updates 13 May: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
News Updates 13 May
News Updates 13 May

अरविंद केजरीवाल उद्या उद्धव ठाकरेंच्या भेटीला

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल उद्या मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज रात्रीच ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

कोल्हापुरात इमारतीला भीषण आग

कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत.

मनोहर जोशींची प्रकृती स्थिर, मेडिकल बुलेटिन जारी

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

यूपीएससीचा निकाल जाहीर, कश्मिरा संख्ये महाराष्ट्रातून पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यातील कश्मिरा संख्ये ही विद्यार्थिनी देशात 25वी तर राज्यात पहिली आली आहे.

2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण केलं: PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिक पार्कमध्ये 20 हजार भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी 2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण केले, असं मोदी संबोधित करताना म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी समुदायाच्या कार्यक्रमात "लिटिल इंडिया" गेटवेची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अल्बानीज यांचे आभार मानले.


सिडनीत PM मोदींचं वैदिक मंत्रोच्चारासह पारंपारिक पद्धतीने स्वागत

सिडनीतील कुडोस बँक एरिना (Qudos Bank Arena) येथे वैदिक मंत्रोच्चार आणि इतर पारंपारिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिडनीतील कुडोस बँक एरिना (Qudos Bank Arena) येथे स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील पंतप्रधान मोदी आहेत.

उद्धव ठाकरेंनी घेतली मनोहर जोशींची भेट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्धव ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्याात आले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये राणेंच्या हस्ते महाआरती; मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

त्र्यंबकेश्वरमध्ये राणेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. संपुर्ण मंदिर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल 

मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये राणेंच्या उपस्थितीत होणार महाआरती; मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

त्र्यंबकेश्वरमध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नितेश राणे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल; पोलिसांचा फौजफाटा तैनात

भाजप आमदार नितेश राणे आज देणार त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. अन्य धर्मियांच्या त्र्यंबकेश्वर प्रवेशामुळे झालेल्या वादानंतर नितेश राणे त्र्यंबकेश्वरमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदेंनी सर्व खासदारांनी बोलावली बैठक

एकनाथ शिंदे यांनी उद्या 8 वाजता वर्षा बंगल्यावर सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत काही महत्वाचा निर्णय होतो का? ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना खासदार संजय राऊत यांचा फोन

जयंत पाटील यांची ईडीची चौकशी झाल्यानंतर संजय राऊत यांनी जयंत पाटलांशी फोनवरून चर्चा केली. आम्ही तुमच्या पाठीशी असल्याच सांगत संजय राऊत यांनी जयंत पाटील यांना समर्थन दिलं आहे. यापुढे अशा घटना घडत राहतील आपण लढत राहू असंही राऊत म्हणालेत.

मुंबईत लवकरच स्फोट होणार असल्याची माहीती

22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने ट्विटरवर "मी लवकरच मुंबईत स्फोट करणार आहे," असा धमकीचा मेसेज पोस्ट केली आहे. तातडीने मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आज शरद पवार घेणार जयंत पाटलांची भेट

आज शरद पवार जयंत पाटलांची भेठ घेणार आहेत. काल तब्बल ९ तास ईडी चौकशी झाल्यानंतर आज शरद पवार जंयत पाटलांची भेठ घेणार आहेत. साडेदहा वाजता सिल्व्हर ओकवरती शरद पवारांची भेट घेणार आहे. ईडीच्या चौकशी संदर्भात जयंत पाटील शरद पवारांना माहिती देणार आहेत.

अमरावतीजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहे. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे. अमरावती- दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगाव फाटा येथे हा अपघात झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यु झाला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com