Chief Minister Eknath Shinde news
Chief Minister Eknath Shinde newssakal

Marathi News Updates:महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

परभणी दौऱ्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गुजरातला रवाना, कारण अद्याप अस्पष्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौरा झाल्यावर गुजरातला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

'भाजप सत्तेचं स्वप्न बघतय', बीआरएस नेत्याचा अमित शाहांना टोला

बीआरएस नेते रवुला श्रीधर रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, " अमित शाह हे दिवसा स्वप्न पाहत आहेत की तेलंगणात भाजप सत्तेत येईल. सत्तेत येण्याचे विसरा त्यांना राज्यात पाचपेक्षा कमी जागा मिळतील. "

चांद्रयान-३ने मोजले चंद्राचे तापमान, इस्रोकडून फोटो जाहीर

भारताने चांद्रयान-३ची मोहीम फत्ते केली. त्यानंतर आता चांद्रयान-३ने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. रोव्हरकडून चंद्राच्या तापमानाचे परिक्षण करण्यात आले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती इस्रोने दिली आहे.

मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

बीडमध्ये अजित पवारांची उत्तरसभा, रोड शो'ने सभेला सुरुवात

बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होत आहे. यापूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. याला उत्तर म्हणून अजित पवार आज सभा घेत आहेत. यावेळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.

अजित पवार बीडमध्ये दाखल, मेटेंच्या समाधीस्थळी नतमस्तक

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला लाग, तिघांचा मृत्यू

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी : मुंबई पोलीस

आगीच्या घटनेबाबत अग्निशमन अधिकारी पीजी दुधाल म्हणतात, "आम्ही आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आठ जणांना वाचवले. तीन जखमींना व्हीएन देसाई रुग्णालयात हलवण्यात आले. तिघांनाही मृत घोषित करण्यात आले. ही आग खोली क्रमांक 204 मध्ये दुसऱ्या मजल्यावर होती आणि ती तिसऱ्या मजल्यावर पसरली. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.

संतोष बांगर यांचे उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

हिंगोलीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संतोष बांगर यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवार बीडकडे रवाना, पावसामुळे हेलिकॉप्टरने जाणं टाळलं

परभणी आणि बीडमध्ये पाऊस सुरु झाल्याने अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने जाणं टाळलं आहे. अजित पवार बीडमध्ये सभा घेणार आहेत.

'आमचं हिंदुत्व मुखात राम आणि हाताला काम देणार',उद्धव ठाकरे

हिंगोलीत सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमचं हिंदुत्व मुखात राम आणि हाताला काम देणार"

हिंगोलीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

हिंगोलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांची तुलना सापाशी केली. कांदाप्रश्नी सरकारनं मध्यस्थी केली पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.

उद्धव ठाकरे हिंगोलीत दाखल,थोड्याच वेळेत सभा सुरु होणार

हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात झाली असून ते व्यासपीठावर आले आहेत.

शक्ती परीक्षा सुरू झालीय; अजित पवारांच्या बीडमधील सभेपूर्वी भुजबळांचं वक्तव्य

बीडमध्ये आज अजित पवार यांच्याकडून उत्तर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूर्वी शरद पवारांनी इथं (बीड) सभा घेतली. अजित दादांसोबत जो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्हाला सुद्धा आमचा पक्ष वाढवायचा आहे. आमची भूमिका लोकांसमोर मांडायची आहे. जे पलीकडून आरोप केले जात आहेत, त्यामध्ये तथ्य नाही हे लोकांना पटवून द्यावे लागेल. त्यासाठी नाही म्हटलं तरी शक्ती परीक्षा सुरू झाली आहे असे मला वाटतं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ य़ांनी दिली आहे.

हिंगोलीत उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी पावसाला सुरूवात

उद्धव ठाकर यांची मराठवाड्यातील हिंगोली येथे रामलीला मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात ही सभा पार पडेल. मात्र हिंगोली येथील उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी पावसाला सरुवात झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी सभेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.

परभणी शहरातले रस्ते खराब झालेत, पण काळजी करू नका; परभणीकरांना फडणवीसांचं आश्वासन

आज शासन आपल्या दारी हा राज्य सरकारचा कार्यक्रम परभणी येथे होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी माझ्या लक्षात आलं की परभणी शहरातील रस्ते खराब झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर खूप दूर उतरवण्यात आलं. इथल्या प्रशासनाल मुख्यमंत्र्यांना रस्ते दाखवले की पैसे मिळतील असं वाटलं. पण मुख्यमंत्र्यांचं परभणीवर प्रेम आहे. काळजी करु नका. येत्या काळात परभणीचं चित्र बदलेलं दिसेल. यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून मुख्य रस्त्यांना काँक्रिटच्या रस्त्यात बांधलं पाहिजेत असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले

मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर लिहिलेल्या खलिस्तान समर्थक घोषणा पोलिसांनी हटवल्या

दिल्लीतील महाराजा सूरजमल स्टेडियम मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर लिहिलेल्या खलिस्तान समर्थक घोषणा दिल्ली पोलिसांनी हटवल्या आहेत.

रस्त्यासाठी ग्रामस्थांचं अर्धनग्न आंदोलन

पूर्णा : माहेर ग्रामस्थांनी माहेर रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी काल शोलेस्टाईल आंदोलन केले. रविवारी सकाळी अर्धनग्न अवस्थेत सिंचन विहिरीत चक्क उड्या मारत आंदोलन केले.

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री परभणीत दाखल

परभणी येथे आज राज्य सरकारचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणीत दाखल झाले आहेत. यावेळी या तीनही नेत्यांचं जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं.

दिल्लीतील मेट्रो स्थानकांवर 'दिल्ली बनेगा खलिस्तान अन् खलिस्तान जिंदाबाद' घोषणा

दिल्लीतील 5 हून अधिक मेट्रो स्थानकांवर कोणीतरी 'दिल्ली बनेगा खलिस्तान आणि खलिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे आहे. दिल्ली पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली असून दिल्ली पोलीस याविरोधात कायदेशीर कारवाई करत आहेत.

ठरलं! उद्या लागणार १०वी - १२च्या पुरवणी परीक्षेचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २८) दुपारी जाहीर होणार आहे.

जपान दौऱ्याहून परतलेल्या फडणवीसांचे CM शिंदेंकडून स्वागत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जपान दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यावरून परत आल्यानंतर आज त्यांचे खास पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जपानने विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या देवेंद्रजींनी या दौऱ्यात जपानमधील जायका, सोनी, डेलॉइट यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, तसेच जपान आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रयत्न केले.

तसेच जपानमधील वित्तसंस्थांसमोर केलेल्या सादरीकणामुळे राज्यातील विकासप्रकल्पांना वित्तीय सहकार्य मिळणे शक्य होणार आहे. या भेटीदरम्यान जपानमधील कोसायन विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याबद्दल देखील डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

भारतीय हवाई दलाकडून हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत

भारतीय हवाई दलाकडून हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत पुरवली जात आहे. 11000 किलोपेक्षा जास्त मदत सामग्री दुर्गम भागात वितरित करण्यात आली आणि 4 रुग्णांना बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडकडून देण्यात आली आहे.

"मी सत्तेसाठी गेलो नाही हे ते खरं सांगत आहेत, ते..." ; वडेट्टीवारांची अजित पवारांवर खोचक टीका

काल बारमती येथे बोलताना अजित पवार सत्तेसाठी हापपलेलो नाही असे अजित पवार म्हणाले होते, यावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टेवार यांनी, मी सत्तेसाठी गेलो नाही हे ते खरं सांगत आहेत. ते ईडी मुळे गेलेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या इडी मुळे गेले असावेत. किंवा ई़डीचा अर्थ काही वेगळा लावला असावा, त्यामुळे ते गेले असतील. मला वाटतं सत्ता हे सर्वोच्च समजूनच हा निर्णय झाला असावा असेही वडेट्टीवार म्हणाले.

मनसेच्या आंदोलनामुळे पनवेल ते पळस्पे वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावर मनसेकडून आंदोलन करण्यात येत असून आज काढण्यात आलेल्या जागर यात्रेमुळे पनवेल ते पळस्पे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहयला मिळाले.

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था! अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात

मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकण जागर यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली असून संपूर्ण कोकणात एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर आज मनसे रस्त्यावर उतरली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून कोकण जागर यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. संध्याकाळी 6 वाजता कोलाड नाका येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने यात्रेची सांगता होईल.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com