दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

देशासह राज्यातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking News
Breaking News Sakal

Live Update: छ. संभाजीनगमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सिल्लोड-पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोटा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक.

धंगेकरांच्या कार्यकर्त्यांचा नादच खुळा; विजयानंतर दिली भन्नाट ऑफर

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर जिंकल्याबद्दल पुण्यातील एका हॉटेल व्यवसायिकाने 'एका रोलवर एक रोल फ्री' अशी ऑफर दिली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका हॉटेल व्यवसायिकाने ही भन्नाट ऑफर दिली आहे.

राज्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावी; अजित पवारांची मागणी

ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना सरकारनं कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्र बंद केली.त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत.तत्काळ राज्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावी

कसबा निवडणूक जिंकली राज्य नाही; CM शिंदेंचा विरोधकांना टोला

सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी चौफेर टीका केली. सहकार क्षेत्रासाठी केंद्राची मदत घेणार. आगामी काळात मुंबईच्या रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत.

मुख्यमंत्री शिंदे याचे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर

आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतयं. समृद्धा रोजगाराला मोठी चालना मिळीली. सरकारनं अनेक कामांना चालना दिली आहे. १२ हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. नियमात बदल करुन शेतकऱ्यांन दुप्पट मदत करण्यात आली आहे. नाफेडकडून कांदयाची खरेदी सुरु आहे. कांदा उत्पादकांच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरु केला. मविआ सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण आम्ही हा लढा ताकदीनिशी लढतोय.

गेल्या सरकारमध्ये दावोसमधून १० हजार कोटींचीही गुंतवणुक नाही. दावोसमध्ये ३०-३५ कोटींचा खर्च झाला. करार झालेल्या कंपन्यांना जागा देण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिली. करारामुळे १ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती.

सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारची काम दिसत नाहीत. विरोधकांनी फक्त राजकीय भाष्य केलं.

सहकार क्षेत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मदत करतायत.

पोलिस भरतीवेळी उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करा, अजित पवार मागणी

पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 वेळेत घेण्याची मागणी अजित पवार यांनी अधिवेशनात केली आहे.

विधानसभेत पेपर फुटीचे पडसाद

बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर विधानसभेच पेपर फुटीचे पडसाद उमटले आहेत. यावेळी अजित पवार यांनी सरकार काय करतयं? झोपलयं का? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र, बोर्डाकडून पेपर फुटीला अधिकृत दुजोरा नाही.

बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला

बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हरियाणात बस-ट्रकचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

हरियाणा येथील अंबालामध्ये बस ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत.

रविंद्र धंगेकर गिरीष बापट यांच्या भेटीला

कसब्यातील विजयानंतर रविंद्र धंगेकर गिरीष बापट यांच्या भेटीला गेले आहेत.

विजयानंतर 'कुरघोडीचं राजकारण, पोलीस यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, गुंडांच्या मार्फत केलेला प्रचार किळसवाणा होता. मीही गिरीश बापटांविरोधात निवडणूक लढवली आहे. पण त्यांनी कधी असं केलं नाही.' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

CM शिंदेंचा संदीप देशपांडेंना फोन

सकाळी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला.

अंगणवाडी सेविकांचा २० टक्के पगार वाढ

मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती होणार आहे. अंगणवाडी सेविकांचा २० टक्के पगार वाढ केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार आहेत. मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे. अशी माहितीही लोढा यांनी दिली आहे.

अंगणवाडी प्रश्नावरुन विरोधकांचा सभात्याग

अंगणवाडी प्रश्नावरुन सभागृहात गोंधळ पहायला मिळाला. विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेता.

पुणे-कोल्हापूर महामार्गावर वाहतुक कोंडी; ५ किमी वाहनांच्या रांगा

पुणे-कोल्हापूर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. जवळपास ५ किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कराडा उड्डाण पुलाच्या कामाच परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

प्रथमोपचारानंतर संदीप देशपांडे घरी रवाना

प्रथमोपचारानंतर संदीप देशपांडे घरी रवाना झाले आहे. त्यांना पायाला चालता येत नाही. त्यांच्या हाताला प्लॅस्टर घालण्यात आलं आहे. त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला. त्यापूर्वी त्यांच्या भेटीला स्वतः राज ठाकरे, अमित ठाकरे आणि नितेश राणे त्यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज ठाकरे यांनी स्वतः त्यांच्या गाडीतून देशपांडे यांना घरी पाठवलं.

विधीमंडळाचा अवमान होईल असं मी विधान केलं नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अख्खा महाराष्ट्र चोर म्हणत आहे. मी फक्त एका पक्षापुरतं चोरं म्हंटलेलं नाही. माझं विधान एका विशिष्ट गटासाठी. मला तुरुंगात टाकून झालं आता फासाला लटकावा. सत्ताधाऱ्यांना कायदाच माहिती नाही.

अमित ठाकरे हिंदूजा रुग्णलायत दाखल

सकाळी मॉर्निग वॉकला गेल्यानंतर राज ठाकरेंचे निकटवर्तीय संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला झाला. यावेळी ते जखमी झाले असून त्यांना हिंदूजा रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी युवा नेते अमित ठाकरे हिंदूजा रुग्णलायत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजेच4 मार्चपासून 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्नांसह महागाईच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला केला. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.   

 पुणे पोटनिवडणुक निकालानंतर राज्यातील घडामोडींना वेग. अने आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तसेच आज अमित शाह बंगळुरुच्या दौऱ्यावर आहेत. पूर्वेकडील राज्य मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com