Marathi News Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Manipur Woman Torture
Manipur Woman Torturesakal

मणिपूरला गेलेले विरोधकांचे शिष्टमंडळ उद्या संसदेत माहिती देणार

काही दिवसांपूर्वी विरोधक खासदाराचं एक शिष्टमंडळ मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेलं होतं. हे खासदार उद्या ३१ जुलैला सकाळी ९.३० वाजता INDIA युतीमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन, मणिपूरमधील परिस्थितीविषयी माहिती देतील.

अकोल्यात संभाजी भिडेंना दाखवण्यात आले काळे झेंडे, त्यांच्याकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध

अकोल्यात संभाजी भिडेंना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. संभाजी भिडे यांचा महाराष्ट्रभरातून निषेध करण्यात येत आहे.

धर्मवीर आनंद दिघे कॅंसर रुग्णालयाचं ठाण्यात भुमीपुजन, सरसंघचालक मोहन भागवत आणि एकनाथ शिंदेही उपस्थित

धर्मवीर आनंद दिघे कॅंसर रुग्णालय आणि त्रिमुर्ती संकुलाचा भुमीपुजन सोहळा ठाण्यात पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

सांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

सांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. पोस्टरवर दुग्धाभिषेक करत त्यांनी संभाजी भिडेंचं समर्थम केलं आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर येण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज रविवारी एका मंचावर येण्याची शक्यता आहे. सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळ्यानिमीत्त ते एकत्र येण्याची शक्यता आहे. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित असणार आहेत.

PM मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधीपक्षांचा विरोध; अलका चौकात दाखवण्यात येणार काळे झेंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोधीपक्षीयांनी विरोध केला आहे. अलका टॉकीज चौकात ते काळे झेंडे दाखवणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित असणार आहेत.

 अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

 अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी ही तक्रार दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर ओसरला; पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील इतर नद्यांमधूनही पाणी झपाट्याने उतरण्यास सुरुवात झाली आहे.

ठाणे महापालिका परिवहन बसच्या इंजिनला लागली आग

ठाण्यातील सेंट्रल मैदानाजवळ ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) बसच्या इंजिनला आग लागली. बसमध्ये 40-50 प्रवासी प्रवास करत होते मात्र ते वेळेवर गाडीतून उतरले. कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

वाशिममध्ये संभाजी भिडेंना नेलं मार्ग बदलून कार्यक्रमस्थळी

वाशिममध्ये संभाजी भिडेंना मार्ग बदलून कार्यक्रमस्थळी नेण्यात आलं आहे. त्याच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस आणि वंचितने विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना मार्ग बदलून कार्यक्रमस्थळी नेण्यात आलं आहे.

दिल्लीतील उद्योग नगर येथील बुटांच्या कारखान्याला भीषण आग

उद्योग नगर येथील बुटांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.

CM शिंदेंनी केली ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या होत्या. त्यामुळे आज रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अनिल राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

इस्रोची यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोट येथून पीएसएली - सी 56 या रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आलं आहे. याच महिन्यामध्ये इस्रोने चांद्रयान - 3 चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

अहमदाबादमध्ये रुग्णालयाला लागली आग; अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अहमदाबादच्या साहिबाग भागातील एका रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. सुमारे 20-25 अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रुग्णालयाच्या तळमजल्याला ही आग लागली होती. पाहता पाहता आग ही पसरली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवतहाणी झाली नाही. वेळीच 100 रुग्णांना सुरक्षितरित्या हॉस्पिटलमधून बाहेर काढलं आहे.

विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट'

आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासह कोकणातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com