Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
maratha reservation
maratha reservationsakal
Updated on

उमरगामधील तुरोरी येथे आंदोलकांनी बस पेटवली

उमरगामधील तुरोरी येथे आंदोलकांनी बस पेटवली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होणार आहे. शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चांना तोंड फुटलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने राज्यपालांना याची माहिती देण्या संदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळत आहे

फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणा संदर्भात भाजपची कोअर कमिटीची बैठक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाची बैठक आयोजित करण्यात आलीये. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आरक्षणावरसाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी दिला राजीनामा तर अनेक काही जागी राजकीय नेत्यांच्या घरावर झाले आहेत. या सर्व विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे. थोड्याच वेळात सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात भाजपाची कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

धायरी येथे 19 वर्षीय गुन्हेगार तरुणाची गोळी झाडून हत्या

धायरी येथे एकोणीस वर्षीय गुन्हेगार तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन विधीसंघर्ष मुलांनी गोळ्या झाडल्या असल्याची माहिती आहे. यामागील कारण समजू शकलेलं नाही.

मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक

बीडमध्ये मराठा समाजाचे आंदोलन उग्र झाले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक देण्यात आली आहे.

जाळपोळीमागे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते; जरांगे पाटलांना शंका

कोट्यवधी असलेला मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जे लोक हिंसाचार करत आहेत ते मराठा समाजातील नाहीत. जाळपोळ करु नका, हिंसा करु नका. हे कोण करतंय याची मला शंका येत आहे. मला कुठेही जाळपोळ व्हायची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

संदीप क्षीरसागर यांचे घर आंदोलकांनी पेटवलं

जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आंदोलकांनी पेटवलं

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आंदोलकांनी पेटवलं आहे. त्यामुळे बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवलं

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय पेटवण्यात आलं आहे. त्यामुळे बीडमध्ये मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचं दिसत आहे.

MP हेमंत पाटलांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे दिला राजीनामा

खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष नसल्याने त्यांनी कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. अध्यक्ष राजीनामा स्वीकारतात का हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.

यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ येथे उपस्थित आहेत. त्यांच्या कार्यक्रमावेळी मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रम सुरु असताना बाहेर गोंधळ घालण्यात आल्याची माहिती सामने दिली आहे.

ऑर्डर कॉपी मिळाली नाही, मिळाल्यास बोलेन- राहुल नार्वेकर

मला अजून ऑर्डर कॉपी प्राप्त झाली नाही. ऑर्डर कॉपीमध्ये काय म्हटलं आहे हे बघितल्या शिवाय मी काय बोलणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.. आम्ही ऑर्डरची प्रतीक्षा करत आहोत त्यात काय म्हटलं हे बघूनच निर्णय घेऊ, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

४० दिवस काय करत होता, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- सुळे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. सरकार गेले ४० दिवस काय करत होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मुद्द्यावरुन राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक जरांगेंच्या भेटीला

जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले आहे.

पाणी प्यायलो तर लेकरांना आरक्षण कसं मिळेलं?- मनोज जरांगे

मनोज जरांगे यांची प्रकृती आज खालवली आहे, त्यांना उभं देखील राहता येत नाहीये, त्यांना आज ग्रामस्थांनी त्यांना आवाहन केलं तेव्हा बोलताना ते म्हणाले पाणी प्यायलो तर लेकरांना आरक्षण कसं मिळेलं.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; गावकऱ्यांची जरांगेंना पाणी पिण्याची विनंती

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. ना धड उभही राहता येत नाहीय. मनोज जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरलं. आधार दिला. गावकऱ्यांची जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली आहे.

आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेबाबतची निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादीसंबधी निर्णय ३१ जानेवारी पर्यंत घ्यावे असे निर्देश दिले आहेत.

शिंदे समितीने आज पहिला अहवाल सादर केला – CM शिंदे

शिंदे समितीने पहिला अहवाल सादर केला आहे, १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी केली, ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मूळ मराठा आरक्षणावर सरकारच काम करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात सर्व तहसीलदारांची उद्या बैठक होण्याची शक्यता

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात सर्व तहसीलदारांची उद्या बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसे द्यायच यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

ST वरील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे फासताना पोलीस-आंदोलनांमध्ये झटापट

इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत कार्यासमोर एक दिवशी लाक्षणी उपोषण करण्यात येत आहे. यावेळी एसटीवरच्या पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे फासताना पोलीस व आंदोलनांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. उपोषण स्थळी स्टेजवर उपोषणकर्त्यामध्ये आंदोलन करण्यावरून वादावादीचा प्रकार समोर आला. इचलकरंजी मराठा समाज आक्रमक झाला असून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले जात आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे, मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही नेते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत, मात्र, काही भागात मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत, तर काही भागात आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

कराडमध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा

सकल मराठा समाजाच्या वतीने कराडमध्ये मोर्चा काढण्यात येत आहे. शिवाजी स्मारकाजवळ मराठा समाज एकवटला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आज घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. त्यांनी दुपारी भेटीची वेळ मागितली आहे. भेट घेऊन खासदारकीचा राजीनामा सादर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे हेही अध्यक्षांना सांगणार आहेत. तर काल पाटील यांनी मराठा समाजातील आंदोलकांसमोर राजीनामा पत्र दिले होते.

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला थोडयाच वेळात सुरूवात होईल

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला थोडयाच वेळात सुरूवात होईल. या बैठकीत न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यभरात मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदणीबाबत ही समिती आढावा घेत होती. या बैठकिनंतर चंद्रकांत दादा पाटील यांची पत्रकार परिषद होणार असून आता पर्यंतच्या समितीच्या कामकाजाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री यवतमाळ येथे शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री हे जरंगे पाटील याच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

उद्या सहा वाजता मुख्यमंत्र्यांनी बोलावली शिंदे गटाची बैठक

उद्या सहा वाजता मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाची बैठक बोलावली. शिंदे गटाच्या मंत्री, आमदार, खासदारांची ‌बैठक बोलवण्यात आली आहे. वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहेत

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवस, मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक, मुख्यमंत्र्यांचा यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम असून त्यानंतर ते जालनाकडे जाण्याची शक्यता आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, इस्रायल आणि हमास यांचे युद्ध, इस्त्रायलने गाजावर बॉम्ब हल्ले सुरुच ठेवले आहेत. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com