Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार; इच्छुकांची नावे आली समोर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Live Update
Live UpdateEsakal

कसबा पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार; इच्छुकांची नावे आली समोर

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस आणि शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा केलाय. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. कसबा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे त्याचप्रमाणे माहविकास आघाडीतील इतर पक्षामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसत नाहीये, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांकडून धरला गेला आजच्या बैठकीत एकूण दहा इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

इच्छुकांची यादी: अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावासह एकूण 10 इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवणार

कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची बैठक पडली पार 

कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकी संदर्भात मनसेची बैठक झाली. पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. या संदर्भात बैठका सुरू आहेत. जो निर्णय राज ठाकरे देतील त्याचे आम्ही पालन करु असंही पदाधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे. २०१२ मध्ये कसबा मतदारसंघात चांगले मतदान मिळाले होते. राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदू भूमिका ही महत्त्वाची ठरू शकते.

कसबा पोटनिवडणूकीत काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? एका जागेसाठी 16 जण इच्छुक

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. सर्व पक्षांकडून या निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यादरम्यान काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 16 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. या पोटनिवडणूकीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या आज ऑनलाईन पद्धतीने झाल्या मुलाखती झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून १६ इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी श्रीनगर येथूल इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या.


Live Updates: बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

Asaram gets Lifeterm in Rape Case : बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला ही शिक्षा सुनावली आहे.

महिला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सरकारी वकिलांनी युक्तिवादात आरोपी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 

जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने आसाराम बापूला 23 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.  तसेच पीडितेला 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी न्यायालयाने आसारामला या प्रकरणात दोषी ठरवले होते. तर आसारामच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

वाचा सविस्तर

MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू होणार, विद्यार्थ्यांचा जल्लोष

मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती.

शिवसैनिक म्हाडाच्या ऑफिसमध्ये घुसले

किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्यामुळे हा वाद चांगलाच वाढला आहे. शिवसैनिकांनी थेट म्हाडाच्या ऑफिस बाहेर मोठा संख्येने ठिय्या मांडला आहे.

किरीट सोमय्य यांना BKC जवळ पोलिसांनी अडवलं

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता. मात्र आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या ठिकाणी सोमय्या पाडकाम झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाणार होते मात्र पोलिसांनी त्यांनी अडवलं आहे.

भाजपकडून सत्यजित तांबे यांना खुली ऑफर

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की भाजपने सत्यजित तांबे यांना मदत केल्याचे निवडणुकांचे निकाल चांगले असतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु, अस म्हणत त्यांनी ऑफर दिली आहे.

पुण्यातील कोयता गँगचा थरार शाळेत ही, विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला

पुण्यातील नु म वी या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून. विद्यार्थ्याच्या हातावर कोयताने वार करण्यात आला आहे. हा हल्ला १७ वर्षीय २ तरुणांनी केला आहे.

Summary

राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण सुरू

2047 पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल आणि ज्यामध्ये आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो 'आत्मनिर्भर' असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल असं राष्ट्रपती मुर्मू यांनी भाषणात सांगितले.

तो असा भारत असावा ज्यामध्ये गरिबी नसेल, ज्याचा मध्यमवर्गही समृद्ध असेल, असा भारत असावा ज्यामध्ये तरुण आणि स्त्रिया समाज आणि देशाला मार्ग दाखवण्यासाठी आघाडीवर उभ्या राहतील, असा भारत ज्याची तरुणाई काळाच्या दोन पावले पुढे राहील.

आज भारताचा आत्मविश्वास उच्च पातळीवर आहे आणि जग तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. भारत जगाला उपाय देत आहे.

पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन केले आहे. अलका टॉकीज चौकात या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच आज अराजकीय "साष्टांग दंडवत" आंदोलन

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. या ठिकाणी अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थितीत आहेत.

पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र या दोन्ही जागांसाठी कोणत्याच पक्षाने उमेदवारच जाहिर केला नाही त्यामुळे अधिकृत कोणताच पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. मात्र अपक्ष उमेदवार आज अर्ज दाखल करू शकतात.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार नाहीत

खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून उड्डाणांना उशीर झाल्यामुळे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर अनेक काँग्रेस खासदार आज सकाळी 11 वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com