Marathi News Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Gofan
Gofanesakal

मुंबईमध्ये मणिपूर महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कॅंडल मार्च काढतं आंदोलन

मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कॅंडल मार्च काढण्यात आलाय. मुंबई कॉंग्रेसच्यावतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. कॉंग्रेस कार्यालयात ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस परिसरात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वर्षा गायकवाड यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

ISISसोबत संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोघांची NIA कोठडी न्यायलयाने फेटाळली

आयसिस या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींच्या NIA कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली झुबैर नूर मोहम्मद शेख आणि झुल्फिकार अली बरोडावला दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळताच ATS ताबा मागितला. या दोघांवर आयसीसच्या महाराष्ट्र माॅड्युलशी जोडले असल्याचा आरोप लावण्यात आला होता.

६८ खासदारांनी मणिपूर विषयावर चर्चा करण्याची दिली नोटीस,पण सरकार चर्चेपासून लांब पळतय, कॉंग्रेस खासदाराचा आरोप

कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार रणदीप सुरजेवाला म्हणाले की,"राज्यसभेच्या ६८ खासदारांनी मणिपूर विषयावर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली आहे. मात्र, सरकार यापासून लांब पळत आहे. सरकारल असं वाटतंय की चर्चा एका तासापेक्षा जास्त नाही झाली पाहिजे आणि त्यावेळी विरोधकांनी यावर बोलू नये. पंतप्रधानांनी संसदेत यावं आणि या विषयावर बोलावं."

सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचाराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी उद्यावर

सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचाराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी उद्यावर गेली आहे. मणिपूर हिंसाचाराशी संबंधित प्रकरणाची राहिलेली सुनावणी उद्या पार पडणार आहे.

भिडेंची मिशी कापणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, समता परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा

समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी तर संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे. संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचं काम सुरु केलं आहे. भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षिस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

पवारसाहेब, मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा- वर्षा गायकवाड

पंतप्रधान मोदी हे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारही त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मुंबई-जयपुर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणाचा फॉरेन्सिक तपास सुरू

जयपुर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस गोळीबार प्रकरणाचा तपास आता सुरू झाला आहे. GRPचं फॉरेन्सिक पथक मुंबई सेंट्रल रेल्वे यार्डात दाखल झाले आहे. मुंबई सेंट्रल यार्डात ट्रेन उभी आहे. आज पहाटेच्या सुमारास RPF जवानाने बेछूट गोळीबार केला होता. गोळीबारात RPFच्या ASI सह एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.

अधिवेशन संपताच राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता

राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे फडणवीस पवार सरकारचा दुसरा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन संपताच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १५ ॲागस्टच्या आत नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आमदारांची नाराजी आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणूका लक्षात घेता मंत्रीमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या काही मंत्रीमंडळात अंतर्गत खांदेपालट होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रीमंडळ विस्तार होताच पालकमंत्री पदे देखील दिली जाण्याची शक्यता आहे.

संभाजी भिडेंना अटक करा, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात आता काँग्रेस चांगलंच आक्रमक झाले आहेत. पुण्यातील बालगंधर्वच्या चौकात काँग्रेसच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात आमदार विश्वजीत कदमही दाखल झाले आहेत. तसंच संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातली पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

आधी सीनियरवर फायरिंग, मग ३ प्रवाशांना संपवलं; एक्सप्रेसमधील गोळीबाराने महाराष्ट्र हादरला

जयपूर मुंबई एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये आज पहाटे गोळीबार झाला आहे. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंह याने गोळीबार केला आहे. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची माहीती समोर आली आहे.

लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

BRS प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. के चंद्रशेखर राव हे उद्या (01 ऑगस्ट) रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. वाटेगावमध्ये राव हे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी ते जाणार आहेत.

BRS प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

अधिवेशनाच कामकाज सुरू होण्यापूर्वी आज पुन्हा विरोधकांची बैठक

अधिवेशनाच कामकाज सुरू होण्यापूर्वी आज पुन्हा विरोधकांची बैठक पार पडणार आहे. सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी संसदेत दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात विरोधी पक्षांची बैठक सुरू होणार आहे. मणिपूर घटनेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

PM मोदींच्या पुणे दौऱ्याविरोधात युवक काँग्रेसने लावले ठिकठिकाणी पोस्टर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतु पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्याला आणि त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोध होत आहे. युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या विरोधात अलका चौक, संभाजी महाराज पुतळा, बालगंधर्व चौक, शनिवारवाडा इत्यादी ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक

जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये (12956) गोळीबाराच्या घटनेत चार जणांचा गोळीबार झाला. हा गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू

जयपूर एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आरपीएफ कॉन्स्टेबलनेच गोळीबार केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com