दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
CBI
CBI esakal

JEE-21 कथित फेरफार प्रकरणी CBI ची शोध मोहिम

JEE-21 कथित फेरफार प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये 19 ठिकाणी शोध घेतला

'छत्रपती संभाजीनगर' नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे मुस्लिम युवकांचा तरुणावर हल्ला

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजरी देण्यात आली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागत करण्यात आले. मात्र छत्रपती संभाजीनगर नामांतराचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे,20 ते 25 मुस्लिम युवकांनी तरुणावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणेकर महिलांसाठी खुशखबर! दर महिन्याच्या 'या' तारखेला करता येणार मोफत प्रवास;

जागतिक महिला दिन अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला आहे. याच निमित्ताने पीएमपीच्या गेल्या अनेक दिवसांपुर्वी बंद पडलेल्या ‘महिलादिनानिमित्त मोफत प्रवास’ हा उपक्रम आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांना आता तेजस्विनी बसमध्ये दरमहिन्याच्या 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ही खुशखबर देण्यात आली आहे. 

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय कोठडीत सोमवारपर्यंत दोन दिवसांची वाढ केली आहे.

सरकार स्मार्ट सिटी, मेट्रोत व्यस्त, शेतकरी झाला दुय्यम- बाळासाहेब थोरात

आमचं सरकार ज्या ज्या वेळी सत्तेत होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना खर्चाचा विचार न करता मदत करण्याचं काम केलं. आजच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला.

बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण

बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. 

औरंगाबादमध्ये नामांतराविरोधात जलील यांचं उपोषण सुरू

औरंगाबादमध्ये नामांतराविरोधात जलील यांचं उपोषण सुरू करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या विरोधात आज खासदार इम्तियाज जलिल उपोषण करणार आहेत. जलिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत. 

मविआने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल - संजय राऊत 

चिंचवडमध्ये विजय हा जगताप पॅटर्नमुळे झाला आहे, भाजपमुळे नव्हे

महाविकास आघाडीने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल

कसबा पेठेत घराघरात पैशाची पाकिटे कोणी फेकली

जनतेने कसबा पेठेत धनशक्ती नाकारली

मी विधिमंडळाचा आदर करतो

मला कायदा, संविधान कळते

दोन्ही पोटनिवडणुकीने धडे दिले आहेत

देशपांडे हल्ला प्रकरणात अटक केलेला एक आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी 

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात अटक केलेला एक आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी नाना पटोले दिल्लीत दाखल

बेळगावचा उल्लेख बेळगावी, अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे बेळगावी असा उल्लेख केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केला, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला आहे. एका नियोजित कार्यक्रमात संदर्भात प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी बेळगावी असा उल्लेख केला होता. बेळगावी उल्लेखावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने खासदार अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठवली होती. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा भागातील संतप्त प्रतिक्रियांनंतर खासदार कोल्हे यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.

संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत.


देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com