
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
१९ मार्चला एकनाथ शिंदेंची खेडमध्ये सभा! उद्धव ठाकरेंना उत्तर देणार
१९ मार्चला एकनाथ शिंदेंची खेडमध्ये सभा होणार आहे. उदय सामंत यांनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना काय उत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.
मिंधेंना जनता स्विकारेल का-
आशीर्वाद यात्रा काढत आहात, चोरांना आशीर्वाद मिळणार का, मिंधेंना जनता स्विकारेल का, हातात धनुष्यबाण आला पण कपाळावर गद्दार असा जो शिक्का बसला आहे तो कधीही पुसला जाणार नाही.
आम्ही काय पाप केले, कोरोनाच्या काळात काम केले, कोकणाला भरघोस मदत केली ही आमची चूक झाली का....
तुमची वंशावळ काय, हे सांगा की आम्हाला
उद्या तुमच्या घरांची काय अवस्था होईल याचाही विचार करा... जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा देतो तेव्हा आमच्यात वेगळीच ताकद येते. सगळ्यांनी जाणता राजा नाटक पाहायला हवे. यावेळी कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आय़ुष्यावर आधारित जाणता राजाचे प्रयोग ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
हीच वेळ आहे खंडोजी खोपडे कोण आणि कान्होजी जेधे कोण हे ओळखण्याची...कान्होजी जेधेंनी महाराजांना साथ दिली. आज खंडोजी खोपडेची पिलावळ महाराष्ट्रात निपजलीय... याचाही विचार करा. हल्ली मी त्यांना मोगॅम्बो म्हणतो. तुम्हाला लढत ठेवायचे हाच त्यांचा विचार आहे.
आमच्यावरच का कारवाई करता, बाकीचे कुणी नाही का, मी अभिमानानं सांगतो की, बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुम्ही कोण आहात हे सांगा आम्हाला, तुमची वंशावळ काय, हे सांगा की आम्हाला
आप - ठाकरे एकत्र लढणार
केजरीवाल यांची भेट झाली आहे. आम्ही आता एकत्रित येऊन लढायचे ठरवले आहे. सत्ताधाऱ्यांनी ईडीची कारवाई मागे लावली आहे. दमदाटी करायची, भीती दाखवायची आणि पक्षात घ्यायचे....असा टोमणा उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
विरोधी पक्षात जो गेला त्याच्यावर आरोप करायचे, ईडीची कारवाई करायची, तो म्हणजे गुन्हेगार असाच शिक्का मारायचा. पूर्वी पक्षात संत साधू होते. आता सगळे संधी साधू आहेत. असे मला वाटते
जीभ हासडून टाकू ; उद्धव ठाकरेंचा इशारा
एसटीची गैरसोय होते आहे. लाज वाटत नाही आता स्वताचा हसरा चेहरा तिकडे लावला आहे. माझं कुटूंब माझी जबाबदारी हे मी म्हणत आलो आणि तो शब्द पाळला. ज्या गतीनं तुम्ही कुटूंब बदलता आहात हे काही बरोबर नाही.
कोकणातील रस्ते बदलण्याविषयी काही सुचना केल्या होत्या. पर्यटकाला उद्योजकाचा दर्जा दिला. त्योक्ते वादळाच्यावेळी मी पाहणी केली. आमच्या सरकारनं सगळ्यांना मदत केली होती. अनेकांना आधार दिला होता. कितीतरी कामं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे. पण माशी शिंकली कुठे...असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
राजन साळवी काय देशद्रोही आहे का, काल परवा मिंधे बोलले की, बरं झालं आमचं देशद्रोहयाबरोबरचं चहापान टळलं, असं बोलणाऱ्यांची जीभ हासडून टाकू.. मुंबई वाचवणारे शिवसैनिक तुम्हाला देशद्रोही वाटतात का...
अजुन काही जणांना खोके मिळले नाहीत - उद्धव ठाकरे
तुमच्या आई वडिलांचे नाव लावा आणि मग पक्ष काढा. मग नाव लावा. मी आता बाहेर पडलो आहे. होऊन जाऊ द्या, नाव, चिन्ह गोठवलं. तरीही आम्ही अंधेरीला जिंकलो. ज्यांचे राजकीय कर्तृत्व तुमच्या आमच्या आधारानं फुललं ते आता आम्हाला शिकवणार, गद्दार आम्हाला शिकवणार का, महाराष्ट्रतील तरुणांच्या नोकऱ्या हिरावल्या. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची हिंमत झाली नाही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. आणि आता हे शेपूट घालून बसले आहेत. दिल्लीसमोर शेपट्या घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. केवळ हिंदूत्ववादी विचार म्हणून भाजपला डोक्यावर घेतले.
मी घरात बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हाला बाहेर पडून सांभाळता आला नाही. अजुन काही जणांना खोके मिळले नाहीत त्यांना सांभाळण्यात तुमचा वेळ जातो आहे. देशाच्या पंतप्रधानांचे कोतूक झाले नाही ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे झाले. हे लक्षात येत नाही का तुमच्या..
एकनाथ शिंदेंवर केला घणाघात
शिवसेना नाव बाजुला ठेवुन लढुन दाखवा... जर तुम्हांला तुमच्या आईवडिलांच नाव लावायला लाज वाटत नसेल आणि त्यांना तुम्हीं लावण्यात लाज वाटत नसेल तर लावा. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहित ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार?
काय आहेत बाळासाहेबांचे विचार? नोकर्या जाऊ द्या हे विचार नव्हते, भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्या शिवसेनेचा विजय असो, हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. कानडी मुख्यमंत्र्यानी डोळे दाखवले की शेपट्या घालुन बसणे हे बाळासाहेबांचे विचार? मी मुख्यमंत्री असताना त्यांची हिंमत नव्हती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
मी 'शिवसेना'च म्हणणार - उद्धव ठाकरे
शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणारे हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या एकीवर घाव घालत आहेत. एवढ्या निष्ठुरपणे, निर्घृणपणे वागत आहेत की ज्यांनी सोबत दिली त्यांना संपवत आहेत. करून पहा. मी 'शिवसेना'च म्हणणार. पक्ष ते देऊ शकत नाही, आम्ही देऊ देणार नाही - असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मैदाना नाव छान 'गोळीबार', पण शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलंय, ढेकणाला मारायला गोळीची गरज नसते. बोट पुरतं. तुमच बोटाच मत त्याला पुरेस आहे. ज्यांना आम्हीं मोठ केल त्यांनी आईवर वार केला. शिवसेना आमची आई आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात...
सभेतील या अभूतपूर्व दृश्याच वर्णन काय करायचं? डोळ्यात मावत नाही अस हे आई जगदंबेच रूप, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी आज तुम्हां सर्व देवमाणसांच दर्शन घ्यायला आलो आहे. ज्यांना आजवर जे जे शक्य ते सर्व दिलं ते खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे, मी तुम्हांला काही देऊ शकत नाही तरी तुम्हीं आलात ही पूर्वजांची पुण्याई.
धनुष्यबाण तुम्हीं चोरला असेल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असे नाही. जिथे रावण उताणा पडला तिथे मिंधे काय पेलणार? निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांनी येऊन पहावं. तो चुना लावणारा आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्तेत आल्यावर शेलार बोलले नाहीत, त्यांच्यात काय मांडवली झाली?
दावोसला 20-20 तास एकनाथभाऊ जागे रहात होते. दावोसच कार्यालय 5-6 ला बंद होत होत तर 6 ते 2 एकनाथभाऊ काम कुणासाठी करत होते?.
एक हजार कोटीची जागा एकनाथ शिंदेंनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने विकली, ज्याबद्दल आशिष शेलारांनी जनहित याचिका दाखल केली. सत्तेत आल्यावर शेलार बोलले नाहीत, त्यांच्यात काय मांडवली झाली?
किरीटभाऊंनी डंपिंग ग्राउंडवर छोट्या छोट्या बाटल्या शोधण्यापेक्षा अख्ख डंपींग ग्राउंड देते. नोंदणी न झालेल्या पक्षाच्या सभेसाठी बीकेसीच्या ग्राऊंडवर करोडो खर्च कुठुन झाला? नारायण राणेंच्या बेकायदा बांधकामाबद्दल बोला.
मराठी माणसाच्या हितासाठी सभा
संजय कदमांच्या विभागवार सभांची सुरुवात होत आहे. शिवगर्जना सभा, पक्षप्रमुखांच्या सभा, विभागवार सभा कशासाठी? निवडणूका लागलेल्या नाहीत तरी सभा घेण्याचे कारण मतांसाठी नाही तर मराठी माणसाच्या हितासाठी आहे, असे अंधारे म्हणाल्या.
आम्ही वाट पहात आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनात समस्यांबद्दल सत्ताधारी बोलतील. परंतु त्याजागी हक्कभंग इ. मोठे मोठे शब्द घेऊन ते उभे आहेत.
अंधारे यांनी आशिष शेलार यांना देखील टोला लगावला. हम बोल रहे हैं, चोर की दाढी मे तिनका! तो आशिष शेलार क्यों दाढी टटोल रहे हैं?, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही - अंधारे
काळ उत्तर देत असतो. रामदास कदमना उत्तर देण्यासाठी त्यांच्या दहा पट ताकदीचा संजय कदम नावाचा चेहरा आज शिवसेनेत दाखल होत आहे- सुषमा अंधारे
मी शिवसेना उल्लेख करते कारण ओरिजनल शिवसेना आम्ही आहोत, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. ओरिजनल बरोबर नसताना काय होत हे कसब्यात दिसलं, असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
कोकणाने निष्ठावंत शिलेदार शिवसेनेला दिले, पण...
कोकणाने निष्ठावंत शिलेदार शिवसेनेला दिले. पण नियमाला अपवाद असतो तसे वटवृक्षावर वाढणारे बांडगुळही दिले - सुषमा अंधारे
कोकणातील नैसर्गिक संकटात रामदास कदम फिरले?
कोकणातील नैसर्गिक संकटात रामदास कदम फिरले? कोरोना संकटात एकाही गावात गेला नाही. 5 वर्ष मंत्री होता, मतदारसंघात काहीही काम केलं नाही. केवळ मुलाकरिता दापोलीत निधी दिला - भास्कर जाधव यांचा आरोप
ज्यांनी गद्दारी केली त्यांची गद्दारी संपवा - जाधव
योगेश कदमांना मला पराभूत करायचे आहे -जाधव
भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली. रामदास कदम यांनी मतदार संघात काहीच विकास केला नाही. रामदास कदम म्हणजे तात्या विंचू आहेत. योगेश कदम यांना मला पराभूत करायचे आहे.
उद्धव ठाकरे सभेसाठी रवाना झाले
उद्धव ठाकरेंच्या सभेला सुरूवात, भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका
रत्नागीरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरे यांची सभा सुरू झाली आहे. आमदार भास्कर जाधव या सभेला संबोधित करत आहेत.
खेडमध्ये संजय कदम यांच्या समर्थकांची रॅली
आज खेडमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यावर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. या सभेपूर्वी संजय कदम यांच्या समर्थकांनी रॅली काढली.
औरंगजेबाचे फोटो झळकवल्याप्रकरणी ४ जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर मध्ये काल औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल, संध्याकाळी तोफ धडाडणार
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाले आहेत. आज खेडमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यावर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे.
परीक्षा केंद्रात मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यावर बंदी
Karnataka News : प्री-विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या परीक्षेत हिजाब (Hijab) घालण्यास परवानगी नाही, असं स्पष्ट मत कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश (Education Minister BC Nagesh) यांनी व्यक्त केलं. दुसरी PUC परीक्षा 9 मार्चपासून सुरू होत आहे. शिक्षणमंत्री म्हणाले, 'गतवर्षीप्रमाणं यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश घालूनच यावं लागणार आहे. हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था आणि शासन नियमानुसार चालत आहे.'
संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या - देवेंद्र फडणवीस
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाबाबतही फडणवीस यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. पोलीस त्यासंदर्भात चौकशी करत आहे. लवकरच आपल्याला यातलं सत्य समजेल, असं फडणवीसांनी म्हटलंय.
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना PMPLबस मधून मोफत प्रवास
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना पी एम पी एल बस मधून मोफत प्रवास
तेजस्विनी या महिलांसाठी सुरू केलेल्या बस मधून प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार, पी एम पी एल चा स्तुत्य उपक्रम
येत्या ८ मार्च म्हणजेच अंतराष्ट्रीय महिला दिना पासून या उपक्रमाला होणार सुरुवात
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात महिलांसाठी १९ मार्गांवर २४ तेजस्विनी बस सुरू आहेत
स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा अनेक मार्गावर तेजस्विनी बस सुरू
मांसाहारी भोजनानंतर देवदर्शनाबद्दल सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
सुप्रिया सुळे यांना विजय शिवतारे यांनी केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी या संपूर्ण भागात महागाई, बेरोजगारी आणि पाण्याचा प्रश्न जाणून घेण्यासाठी फिरत आहे. त्यामुळे विजय शिवतारे काय बोलले, याबाबत मला खरंच माहिती नाही. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विजय शिवतारे यांच्या वक्तव्याची माहिती दिली. तुम्ही मटण खाऊन देवळात गेलात, यावरुन टीका सुरु असल्याचे सांगितले. तसेच मटण खाऊन मंदिरात गेल्याने काही होतं का, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी फार बोलणे टाळले. माझा या विषयावर अभ्यास फार कमी आहे. तुम्ही महागाई, अर्थव्यवस्था, बेरजोगारी आणि पाण्याच्या समस्येविषयी प्रश्न विचारलेत तर मी त्यावर बोलू शकेन, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांवर अस्मानी संकटात, अवकाळी पावसाने नाशिकला झोडपलं
नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मालेगाव, सटाणा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तर कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरबऱ्यासह आंबा मोहराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.
मुंबईत ३ दिवस होणार १० टक्के पाणी कपात
ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महानगरपलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु होते. त्यावेळी बृहन्मुंबई महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती झाली. या गळती दुरुस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गुरुवार, दिनांक ९ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासूव शनिवार, दिनांक ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १० पर्यंतच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; दोघे जखमी
मुंबई-बंगळुरू महामार्गावर दोन मालवाहू ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकमधील दोन जण जखमी झाले आहेत. महामार्गावर सुसर खिंड येथील महिंद्रा शोरूसमोर आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतली हेमंत रासनेंची भेट
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतली हेमंत रासनेंची भेट घेतली आहे. यावेळी कसबा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांशी चंद्रकांत पाटलांनी संवाद साधला आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोटनिवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतलेत त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचे चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर